प्रातिनिधिक फोटो
मुंबई

Kalbadevi: चिराबाजारात भिंत कोसळून २ ठार

काळबादेवी-चिराबाजार परिसरातील एका आवाराची भिंत सोमवारी दुपारी कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य एकजण जखमी झाला आहे.

Swapnil S

मुंबई : काळबादेवी-चिराबाजार परिसरातील एका आवाराची भिंत सोमवारी दुपारी कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य एकजण जखमी झाला आहे. पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या दुर्घटनेची माहिती मिळाली.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या फणसवाडीतील अग्यारी गल्लीत ही दुर्घटना घडली. तेथील ‘२०-७ गांधी’ इमारतीच्या भागातील सुमारे सात फूट उंचीची तसेच ३० फूट लांबीची आवारभिंत नजीकच्या घरगल्लीत कोसळली. कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांची अग्निशमन दलाने सुटका केली. त्यापैकी विनयकुमार निषाद (३०) आणि रामचंद्र सहानी (३०) या दोघांना जीटी रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले. तर, सनी कनोजिया (१९) याच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video