मुंबई

कांदिवलीकरांना मिळणार नवीन पूल; मुंबई महापालिका तब्बल ३० कोटी खर्च करणार

भूखंड रस्त्यासाठी पालिकेच्या विकास नियोजन आरक्षित ठेवल्याने त्या ठिकाणी पूल बांधण्यात येणार आहे.

प्रतिनिधी

कांदिवली पश्चिम येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पूल विभागाच्या माध्यमातून पोईसर जिमखाना येथे चार लेनचा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे कांदिवली पश्चिम येथील डहाणूकर वाडी, चारकोप सेक्टर १ व २ परिसरात होणारी वाहतूककोंडी फुटणार, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाचे मुख्य अभियंता सतीश ठोसर यांनी सांगितले. दरम्यान, या नवीन पुलासाठी मुंबई महापालिका तब्बल ३० कोटी १५ लाख २० हजार ८२८ रुपये खर्च करणार आहे.

कांदिवली पश्चिम येथील पोईसर चर्चवरून एक रस्ता असून तो सध्या वापरात नाही. हा भूखंड रस्त्यासाठी पालिकेच्या विकास नियोजन आरक्षित ठेवल्याने त्या ठिकाणी पूल बांधण्यात येणार आहे. पोईसर नदीशेजारी पारेख नगर येथे अस्तित्वात असलेला एक जुना पादचारी पूल असून, तो पाडण्यात येणार आहे.

पादचारी पूल जमीनदोस्त केल्यानंतर त्या ठिकाणी वाहतूककोंडी व नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पोईसर जिमखाना येथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे. पोईसर चर्च ते रघुलीला मॉल, चारकोप परिसरात होणारी वाहतूककोंडी फुटणार आहे. नवीन पूल खुला झाल्यानंतर वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वेळेची व पैशांची बचत

या ठिकाणी मेडिकल कॉलेज होणार असून, महावीर नगर ते कांदिवली स्टेशनपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना रिक्षासाठी ५० रुपये मोजावे लागतात आणि वळसा घालून जावे लागते; मात्र हा पूल झाल्यानंतर चारकोप सेक्टर १ व २, डहाणूकर वाडी परिसरातील वाहतूककोंडी फुटणार आहे. तसेच हा पूल झाल्यानंतर थेट बोरिवलीला जाणे सोयीस्कर होईल, अशी माहिती भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका प्रियांका मोरे यांनी दिली.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस