मुंबई

केईएमला मिळाला हृदय प्रत्यारोपणाचा परवाना

Swapnil S

स्वप्नील मिश्रा/मुंबई : मुंबई मनपाच्या केईएम रुग्णालयाला हृदय प्रत्यरोपणाचा परवाना मिळाला आहे. मात्र, या प्रत्यारोपणासाठी लागणारे मशीन निविदेच्या फेऱ्यात अडकले आहे. या मशीनसाठी दोन महिन्यात तीन वेळा निविदा मागवल्या होत्या. मात्र, कोणत्याही कंपनीने त्यासाठी रस दाखवला नाही. हे मशीन मिळताच तात्काळ हृदय प्रत्यारोपण करण्याचे केईएम रुग्णालयाने ठरवले आहे.

५६ वर्षानंतर केईएम रुग्णालयाला हृदय प्रत्यारोपणाचा परवाना मिळाला आहे. या परवान्यामुळे प्रत्यारोपणाला लागणारा विलंब आता कमी होणार आहे. मात्र, यासाठी लागणारे खास मशीन मिळेपर्यंत विलंब लागेल.

मुंबई मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई मनपाच्या निविदा प्रक्रियेत मोठी कागदपत्रांची गरज लागते. त्यामुळे निविदा भरायला कंपन्या मागे राहत आहेत. हृदय प्रत्यारोपणाची सोय करून रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाने हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया परवाना मिळण्यासाठी २०२३ मध्ये अर्ज केला होता.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही केईएम रुग्णालयाला हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियेचा परवाना दोन महिन्यांपूर्वीच दिला आहे. ही शस्त्रक्रिया करताना इन्फेक्शनमुक्त ऑपरेशन थिएटर, फुफ्फुसाचे मशीन तसेच प्रत्यारोपणाचे तज्ज्ञ लागतात. तसेच खास हृदय-फुफ्फुस मशीनची या शस्त्रक्रियेसाठी आवश्यकता असते. या मशीनची किंमत १ ते १.५ कोटी रुपये आहे.

केईएमचे अधिष्ठाता डॉ. संगीता रावत म्हणाले की, आम्ही हृदय प्रत्यारोपणासाठी लागणाऱ्या मशीनची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरातील नामवंत व अनुभवी हृदयरोग सर्जनची मदत घेत आहोत. यंदा ही सेवा सुरू करण्याचे आम्ही ठरवले आहे. खासगी रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची किंमत २५ ते ३० लाख रुपये आहे.

एका अधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले की, काही कंपन्यांनी या मशीनसाठी निविदा भरल्या. मात्र त्यांनी माघार घेतली. कारण निविदा प्रक्रियेसाठी लागणारे भरमसाट कागदपत्रे भरण्याची व पैसे उशिरा मिळणार असल्याने ते तयार नाहीत.

मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मनपा रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला. कारण गरीबांनाही या सेवेचा लाभ मिळाला पाहिजे. यंदाच्या वर्षात केईएममध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडेल. मुंबईत ५९ रुग्ण हृदय प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीवर आहेत.

पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज, पाहा काय म्हणाले?

"हे व्होट जिहाद करतात..."नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

"मी हिंदू-मुस्लिम करणार नाही, हा माझा संकल्प..." पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

शिंदे गटाच्या उमेदवारांच्या संपत्ती सर्वाधिक वाढ; यादीत श्रीकांत शिंदे प्रथमस्थानी