मुंबई

KEM Hospital: मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात परिचारिकांचे आंदोलन; काय आहे कारण?

मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय म्हणून ओळखले जाणाऱ्या के.ई.एम रुग्णालयातील (KEM Hospital) परिचारिकांनी आंदोलन केले.

प्रतिनिधी

मुंबईतील प्रसिद्ध के.ई.एम. रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात शेकडो परिचारिकांनी आंदोलन केले. हॉस्पिटलबाहेरील जागेत शेकडो परिचारिका एकत्र आल्या आणि त्यांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. यामुळे काहीकाळ रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली होती. नर्स आणि वार्डबॉय यांनीही या आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला.

के.ई.एम. रुग्णालयाच्या प्रशासनाने काही दिवसांपूर्वी नोटीस काढत परिचारिकांना नर्स क्वार्टर रिकामे करण्यास सांगण्यात होते. तसेच त्यांना टीबी रुग्णालयामध्ये स्थलांतरीत होण्यास सांगितले होते. याला परिचारिकांचा विरोध होता. त्यामुळे शेकडो परिचारिकांनी शुक्रवारी सकाळपासूनच रुग्णालयातील कामकाज ठप्प करत आंदोलन केले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री