Mumbai : खारचे फुटपाथ अतिक्रमणमुक्त; एच पश्चिम विभागाची धडक कारवाई 
मुंबई

Mumbai : खारचे फुटपाथ अतिक्रमणमुक्त; एच पश्चिम विभागाची धडक कारवाई

पादचारी प्रथम अभियानांतर्गत एच पश्चिम विभागातील खार येथील मधु पार्क परिसरातील फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत फुटपाथवरील बेकायदा बांधकामे, स्टाॅल, दुकाने हटवण्यात आल्याचे एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पल्लेवाड यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : पादचारी प्रथम अभियानांतर्गत एच पश्चिम विभागातील खार येथील मधु पार्क परिसरातील फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत फुटपाथवरील बेकायदा बांधकामे, स्टाॅल, दुकाने हटवण्यात आल्याचे एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पल्लेवाड यांनी सांगितले.

पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून ५० टक्के मुंबईकर पायीच प्रवास करतात. पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे पदपथ मिळावे यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार 'पादचारी प्रथम' अभियान हाती घेतले आहे. मुंबई महापालिकेच्या २६ विभागीय कार्यालय क्षेत्रात फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. वांद्रे येथील हिल रोडवरील फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली असून अतिक्रमणमुक्त फुटपाथ ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार, असा इशारा एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पल्लेवाड यांनी दिला आहे. उपायुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणमुक्त फुटपाथ ही कारवाई सुरू आहे.

दरम्यान, शनिवारी केलेल्या कारवाईदरम्यान अनधिकृत शेड, विविध वस्तू व इतर अडथळे हटविण्यात आले. तसेच पदपथावरील ट्री गार्ड्स व इतर साहित्य हटवून पदपथाची स्वच्छता करण्यात आल्याचे पल्लेवाड यांनी सांगितले.

पदपथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ व अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ही कारवाई करण्यात आल्याचे पल्लेवाड यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण; सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही

रत्नागिरीकरांना पावसाचा दिलासा! देवरुख परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी

महाराष्ट्र FDA करणार कर्नाटक मॉडेलचा अभ्यास; औषधांची खरेदी किंमत नमूद करण्यासाठी पडताळणी

कंत्राटदारांचे आज आंदोलन; राज्य सरकारकडे ८६ हजार कोटी थकले

Mumbai : हुश्श! उष्णतेच्या लाटेपासून दिलासा; कुलाबा, अंधेरी, भांडुपमध्ये सर्वाधिक खराब हवा