मुंबई

कल्याण-डोंबिवलीदरम्यान लोकलमध्ये चाकूहल्ला; तिघे जखमी, आरोपीला अटक

कल्याण ते डोंबिवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाने तीन प्रवाशांवर चाकूने हल्ला केला.

Swapnil S

डोंबिवली : कल्याण ते डोंबिवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाने तीन प्रवाशांवर चाकूने हल्ला केला. धक्का लागण्याच्या किरकोळ वादातून ही घटना घडली. याप्रकरणी शेख जिया हुसेन (१९) या तरुणाला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.

१८ फेब्रुवारी रोजी अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांकरिया, राजेश अशोक चांगलानी या तिघांनी कल्याण-दादर जलद लोकल सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांनी कल्याण स्टेशनवरून पकडली होती. त्याच लोकलमधून आरोपी शेख जिया हुसेन हा प्रवास करत होता. तो मुंब्रा येथे उतरणार होता. ट्रेनमधील प्रवाशांनी आरोपीला ही जलदगती लोकल असून मुंब्रा येथे थांबत नसल्याचे सांगितले. या माहितीनंतर आरोपीने ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीला सहप्रवाशांचा धक्का लागला. त्यामुळे त्याच्यात व अन्य प्रवाशांमध्ये वाद झाला. त्या वादात आरोपीला अन्य प्रवाशांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपीने खिशातील चाकू काढून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत.

प्रवाशांनी आरोपीला पकडले

प्रवाशांनी त्या आरोपीला पकडून ‘आरपीएफ’ला कळवले. ‘आरपीएफ’च्या अंमलदारांनी आरोपीला ठाणे रेल्वे स्टेशनात हजर केले. जखमी प्रवाशांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा