प्रगत ‘पल्स्ड फिल्ड ॲब्लेशन’ तंत्रज्ञानाने यशस्वी उपचार; कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नवा विक्रम 
मुंबई

Mumbai : प्रगत ‘पल्स्ड फिल्ड ॲब्लेशन’ तंत्रज्ञानाने यशस्वी उपचार; कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नवा विक्रम

एका ६२ वर्षीय महिलेला गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून हृदयाच्या सततच्या अनियमित ठोक्यांमुळे खूप त्रास होत होता.

Swapnil S

मुंबई : एका ६२ वर्षीय महिलेला गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून हृदयाच्या सततच्या अनियमित ठोक्यांमुळे खूप त्रास होत होता. त्या औषधोपचार घेत होत्या, पण त्यांच्या हृदयाचे ठोके अनियंत्रित होत होते. चिंताजनक बाब म्हणजे हृदयाचे ठोके सामान्य करण्यासाठी जी औषधे दिली होती, त्यामुळेच ते धोकादायक पातळीपर्यंत कमी झाले होते. त्यामुळे मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर प्रगत पल्स्ड फिल्ड ॲब्लेशन तंत्रज्ञानाने यशस्वी उपचार करण्यात आले. त्यांच्या हृदयाचे ठोके नियंत्रित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

ही पश्चिम भारतात करण्यात आलेली पहिली पल्स्ड फिल्ड ॲब्लेशन प्रक्रिया आहे. यामुळे ही प्रक्रिया महाराष्ट्र आणि पश्चिम भागातील रुग्णापर्यंत पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सुमारे १८ महिन्यांपूर्वी अमेरिकेत प्रथमच वापरले गेले आणि नंतर युरोपमधील प्रमुख केंद्रांमध्ये वापरले जाऊ लागले. पारंपरिक तंत्रांमध्ये अनियमित हृदयाच्या ठोक्यांसाठी जबाबदार असलेल्या हृदयाच्या असामान्य ऊती नष्ट करण्यासाठी उष्णता (रेडिओफ्रिक्वेन्सी) किंवा थंडी (क्रायोथेरपी) वापरली जाते. याउलट, या नवीन तंत्रात काही मायक्रोसेकंदांसाठी उच्च-ऊर्जा विद्युत स्पंदनांच्या (सुमारे १,५०० व्होल्ट) तीव्र लहरींचा वापर केला जातो. इलेक्ट्रोपोरेशन नावाच्या प्रक्रियेद्वारे, हे तंत्र आजूबाजूच्या निरोगी ऊतींना इजा न पोहोचवता, केवळ असामान्य हृदयपेशी निवडून नष्ट करते.

आजाराचे स्वरूप

ॲट्रियल फायब्रिलेशन सर्वात सामान्य हृदयाच्या ठोक्यांचा विकार आहे. जगभरात अंदाजे ५ कोटी लोकांना याचा त्रास होतो. या विकारामुळे हृदयाचे वरचे कप्पे अनियंत्रितपणे धडकतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. या आजाराचे निदान अनेकदा होत नाही, कारण सुमारे एक तृतीयांश रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. शिवाय, अनेक रुग्णांना पॅरॉक्सिस्मल एएफचा अनुभव येतो, जो सामान्य ईसीजीद्वारे ओळखणे कठीण असते. जगभरातील अंदाजे पाचपैकी एका स्ट्रोकचे एक कारण ॲट्रियल फायब्रिलेशन असते.

महिलेने मानले आभार

दुसऱ्याच दिवशी रुग्णालयातून चालत बाहेर पडेन अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती. कित्येक महिन्यांपासून, माझ्या हृदयाच्या जलद ठोक्यांमुळे माझ्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला होता. जणू काही मला नवीन आयुष्यच मिळाले आहे, असे म्हणत त्या महिलेने रुग्णालय आणि डॉक्टरांचे आभार मानले.

पल्स्ड फील्ड ॲब्लेशन हे ॲट्रियल फायब्रिलेशनच्या उपचारातील एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. हृदयाच्या असामान्य ऊतींना टार्गेट करण्यासाठी उच्च-ऊर्जेच्या विद्युत स्पंदनांचा वापर करून, हे तंत्रज्ञान पारंपरिक अॅब्लेशन पद्धतींपेक्षा एक सुरक्षित आणि अधिक प्रभावी पर्याय उपलब्ध करून देते.
डॉ. व्यंकट डी. नागराजन, कन्सल्टन्ट कार्डिओलॉजिस्ट व इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट

प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट; मुख्यमंत्र्यांची घोषणा

सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव केंद्राकडे का पाठवला नाही? सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सवाल

Mumbai : बेकायदा शाळांवर कारवाईचा बडगा; १११ अनधिकृत शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हे दाखल करा - राजेश्री शिरवडकर

Mumbai : बीकेसी मेट्रो स्थानकात आढळला अतिविषारी घोणस

Mumbai : बसथांबा स्थलांतरावरून खडाजंगी; बेस्ट समिती अध्यक्ष-उबाठात बाचाबाची