'लालबागचा राजा' येतोय! श्री गणेश मुहूर्त पूजनाने उत्सवाच्या तयारीचा श्रीगणेशा, पाहा खास फोटो 
मुंबई

Mumbai : 'लालबागचा राजा' येतोय! श्री गणेश मुहूर्त पूजनाने उत्सवाच्या तयारीचा श्रीगणेशा, पाहा खास फोटो

मुंबईतील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या २०२६ च्या गणेशोत्सवाच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली आहे. श्री गणेश मुहूर्त पूजन उत्साहात पार पडले असून यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे.

Mayuri Gawade

मुंबईतील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या २०२६ च्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आज पहाटे पारंपरिक पद्धतीने श्री गणेश मुहूर्त पूजन पार पडले. भक्तीमय वातावरणात झालेल्या या विधीनंतर यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीला अधिकृतरित्या सुरुवात झाली.

पहाटे पार पडले मुहूर्त पूजन

परंपरेनुसार मंगळवारी (दि.९) पहाटे ५ वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते श्री गणेश मुहूर्त पूजन करण्यात आले.

यावेळी मंडळाच्या पावती पुस्तकांचे पूजन खजिनदार मंगेश दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. मुहूर्त पूजनानंतर लालबागच्या राजाच्या भव्य गणेशोत्सवाच्या नियोजन आणि विविध तयारीच्या कामांना सुरुवात झाली आहे.

बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा

यंदा गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थीपासून सुरू होणार असून २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत उत्सव साजरा केला जाणार आहे.

प्रथम दर्शन सोहळ्याकडे भक्तांचे लक्ष

मुख्य उत्सवापूर्वी होणारा ‘प्रथम दर्शन सोहळा’ हा देखील भाविकांसाठी मोठे आकर्षण असतो. दरवर्षी देशभरातून लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत दाखल होतात. मुखदर्शन रांग असो किंवा चरणस्पर्श दर्शन, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होत असते.

मुहूर्त पूजन पार पडल्याने आता लालबागच्या राजाच्या २०२६ च्या गणेशोत्सवाची अधिकृत तयारी सुरू झाली असून आणखी एका भव्य आणि भक्तिमय उत्सवाची उत्सुकता गणेशभक्तांमध्ये निर्माण झाली आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Karjat : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी; मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कलाकार मग्न

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी