Mumbai : लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न; २२ तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
मुंबई

Mumbai : लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न; २२ तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप

तब्बल २२ तासांच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. हजारो भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

Mayuri Gawade

मुंबईतील गणेशोत्सवाचा मुख्य आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाला अखेर भावपूर्ण निरोप देण्यात आला. तब्बल २२ ते २३ तास चाललेल्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीनंतर शनिवारी (दि. २६) सकाळी १०:४५ च्या सुमारास गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात हजारो भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.

२२ तास चालली मिरवणूक

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी सुरू झाली. लालबागहून निघालेला बाप्पाचा रथ नियोजित मार्गावरून गिरगाव चौपाटीकडे रवाना झाला. या संपूर्ण मार्गावर भाविकांची मोठी गर्दी होती. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले.

गिरगाव चौपाटीवर हजारो भाविक

शनिवारी सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. समुद्रकिनारी भाविकांचा मोठा जनसमुदाय जमला होता. अखेर सकाळी १०.४७ वाजता बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविकांनी जयघोष करत आपल्या लाडक्या राजाला निरोप दिला.

लालबागच्या राजाच्या विसर्जनाने मुंबईतील बारा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता झाली. बाप्पाच्या पुढील वर्षीच्या आगमनाची आस मनात ठेवत भाविकांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; ४ भाविक जखमी, संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड, VIDEO

शिवनेरीचे तिकीट आता व्हॉट्सॲपवरून बुक करता येणार; दादर-पुणे शिवनेरीसाठी एसटी महामंडळाची प्रायोगिक सुविधा

काँक्रिटीकरणाच्या ३८० कोटींच्या कामांना ब्रेक; टप्पा- २ मधील ईगल व NCC ची कामे काढून घेणार; नव्या निविदांद्वारे टप्पा- ३ मध्ये समावेश

मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट; ५०० हून अधिक विहिरींचे अधिग्रहण, २४६ टँकर सुरू

दार्जिलिंग टॉय ट्रेनचा जागतिक पर्यटनात डंका; ‘लोनली प्लॅनेट’ची २०२७ साठी सर्वोत्तम ठिकाणांची यादी जाहीर