मुंबई

'गंमत : म्हणी आणि वाक्प्रचारांची' या विषयावर व्याख्यान

म्हण आणि वाक्प्रचार यातील फरक, वाक्प्रचारांचे वैशिष्ट्य अशा विविध पैलूंवर त्यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याशी मनमोकळा संवाद साधला

Swapnil S

मुंबई : २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून, मुंबई, वडाळा स्थित एस. आय. डब्ल्यू. एस. महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळ व सांस्कृतिक समितीने, 'गंमत : म्हणी आणि वाक्प्रचारांची' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व वक्त्या म्हणून यावेळी प्रसिद्ध वृत्त निवेदिका व सूत्रसंचालिका दीपाली केळकर उपस्थित होत्या. ‘म्हणी आणि वाक्प्रचार’ म्हणजे आपल्या भाषेची श्रीमंती आहे, वैभव आहे.

केवळ आपली मराठी भाषाच नाही, तर सर्वच प्रादेशिक आणि परकीय भाषा, म्हणी आणि वाक्प्रचार यांनी समृध्द आहेत ‘असं’ ‘गंमत : म्हणी आणि वाक्प्रचारांची’ या कार्यक्रमादरम्यान बोलताना दीपाली केळकर यांनी सांगितले. तसेच म्हण ही सुईसारखी असते, असं सांगत म्हणींचे विविध प्रकार, अनेक विषयांवरच्या म्हणी...उदा. स्वावलंबन, एकी, बचत, वेळेचे महत्त्व, संगती इत्यादी तसेच काही म्हणीच्या गोष्टी, त्यातील अर्थपूर्णता, रंजकता केळकर यांनी उलगडून दाखवली.

म्हण आणि वाक्प्रचार यातील फरक, वाक्प्रचारांचे वैशिष्ट्य अशा विविध पैलूंवर त्यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनाली लोंढे, उपप्राचार्या नीता खानोलकर, मराठी वाङ्मय मंडळाच्या डॉ. तनुजा परुळेकर व दीपाली खेडेकर तसेच महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या बेट्टी मॅथ्यु आणि इतर प्राध्यापकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी