मुंबई

प्लास्टिक,रबर कचऱ्यामुळे पक्ष्यांच्या जीवितास धोका

लोकांनी प्लास्टिक, रबर, कोरोनाकाळातील मास्क याचे योग्य विघटन न झाल्याने त्याचा पक्ष्यांना कसा धोका निर्माण झाला

देवांग भागवत

पक्ष्यांचे स्थलांतर हा आश्चर्यजनक निसर्गक्रम आहे. विविध लहान-मोठे पक्षी आपापल्या गरजेनुसार कधी जवळच्या प्रदेशात, देशांतर्गत; तर कधी एका खंडातून दुसऱ्या खंडावर विविध मार्गाने स्थलांतर करतात. ऋतुमानानुसार खाद्य मिळविण्यासाठी, तीव्र हवामानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी, घरटी करण्यासाठी व पिल्ले वाढविण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांनी पक्षी स्थलांतर करतात; मात्र वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि निसर्गाला गृहीत धरत चालू असलेल्या नियमबाह्य घटनांमुळे पक्ष्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाल्याचे उघड झाले आहे.

‘बर्ड्स अॅण्ड डेब्रिज’ (पक्षी आणि ढिगारे) या एका ऑनलाइन प्रकल्पाअंतर्गत जगभरातील लोकांनी प्लास्टिक, रबर, कोरोनाकाळातील मास्क याचे योग्य विघटन न झाल्याने त्याचा पक्ष्यांना कसा धोका निर्माण झाला आहे, याबाबतचे धक्कादायक फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, एक अंटार्क्टिका खंडाचा अपवाद वगळला तर जगातल्या सर्व खंडांमध्ये प्लास्टिक, रबर अशा कचऱ्यात अडकून पक्ष्यांच्या जीवितास धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जेमतेम दोन शतकांपूर्वी ‘पक्षी स्थलांतर करतात’ हे माणसाच्या लक्षात आले. काडेपेटीएवढ्या वजनाचा पक्षी आठ हजार किलोमीटर अंतर प्रवास करून युरोपातून आफ्रिकेपर्यंत जातो. जगातील पक्ष्यांच्या एकूण जातींपैकी ४० टक्के प्रजाती स्थलांतर करतात. देशांतर्गत आणि जगभरात पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक मार्ग पक्षिशास्त्रज्ञांनी अभ्यास करून शोधून काढले आहेत. अलीकडे काही वर्षे मात्र स्थलांतरित पक्ष्यांच्या येण्या-जाण्याच्या काळात, संख्येत चिंताजनक बदल होऊ लागले असल्याची निरीक्षणे पक्षीअभ्यासकांकडून नोंदवण्यात आली आहेत. तळी-सरोवरांत मुक्काम करणाऱ्या पक्ष्यांचे अधिवास आटत चालले आहेत. त्यांना पुरेसे खाद्य, घरटी बांधण्यायोग्य आसरे मिळेनासे झाल्याने अनेक पक्षी स्थलांतरादरम्यान मुक्कामाच्या पारंपरिक ठिकाणी फिरकेनासे झाले आहेत.

निसर्गात सर्व काही आलबेल नसल्याची ही लक्षणे आहेत. जगभरात वाढत्या प्लास्टिक, रबर, थर्माकोल आदी कचऱ्यामुळे जगभरात पक्ष्यांसाठी धोका निर्माण झाला आहे. नुकतेच 'बर्ड्स अॅण्ड डेब्रिज' (पक्षी आणि ढिगारे) या एका ऑनलाइन प्रकल्पाअंतर्गत जगभरातील लोकांनी मास्कमध्ये अडकलेले पक्षी, काड्याकुड्यांऐवजी रबराच्या वायरी आणि कचऱ्याने बांधलेली घरटी अशा विविध घटनांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एक अंटार्क्टिकाचा अपवाद वगळला, तर जगातल्या सर्व खंडांमध्ये अशा कचऱ्यात अडकलेल्या पक्ष्यांचे फोटो समोर आले आहेत.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजप कार्यालय जाळलं, ४ जणांचा मृत्यू, कर्फ्यू लागू

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

Mumbai Metro: सर्व मेट्रो तिकिटासाठी आता एकच ॲप; एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गांसाठी तिकिटे खरेदी करता येणार