मुंबई

लाइफलाइन एक्स्प्रेस हॉस्पिटल ऑन व्हील सज्ज दीड लाख शस्त्रक्रिया, १२ लाख रुग्णांवर उपचार

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत रत्नागिरी, बल्लारशाह आणि लातूर येथे प्रकल्प राबवले आहेत

नवशक्ती Web Desk

मुंबई : लाइफलाइन एक्स्प्रेस हॉस्पिटल ऑन व्हीलच्या माध्यमातून १.४६ लाख शस्त्रक्रिया, १२.३२ लाख रुग्णांवर उपचार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लाइफलाइन एक्स्प्रेस हॉस्पिटल ऑन व्हील प्रवासी सेवेत दाखल झाली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांच्या हस्ते शुक्रवारी सीएसएमटी येथे लाइफलाइन एक्सप्रेस-हॉस्पिटल ऑन व्हील्सचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रोफेसर (डॉ) रोहिणी चौगुले, व्यवस्थापकीय विश्वस्त, इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन, गौतम दत्ता, मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, राजेश अरोरा, प्रधान मुख्य अभियंता, रेणू शर्मा, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी, मध्य रेल्वे, यांच्यासह यावेळी मुंबई विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अखलाक अहमद आणि मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय उपकरणासह टीम कार्यरत

भारतीय रेल्वेने, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनच्या सहभागातून देशातील कानाकोपऱ्यातील या गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने १६ जुलै १९९१ रोजी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जगातील पहिले लाइफलाइन एक्सप्रेस-हॉस्पिटल ऑन व्हील्स सुरू केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, ७ डब्यांची ट्रेन रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि अगदी शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या (डॉक्टर्स) समर्पित टीमने सुसज्ज आहे.

भारतातील १९ राज्यांत प्रवास

लाइफलाइन एक्स्प्रेसने भारतातील १९ राज्यांत प्रवास केला आहे, १३८ जिल्ह्यांतील २०१ ग्रामीण स्थाने व्यापून, १.४६ लाख शस्त्रक्रियेसह १२.३२ लाख रुग्णांना वैद्यकीय उपचार प्रदान केले आहेत. यामध्ये हालचाल, दृष्टी, श्रवण, चेहऱ्यावरील विकृती सुधारणे, एपिलेप्सी, दंत समस्या, कर्करोग आणि इतर अनेक उपचारांचा समावेश असून संपूर्ण मोफत आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत रत्नागिरी, बल्लारशाह आणि लातूर येथे प्रकल्प राबवले आहेत.

तुर्कीच्या दिशेने रवाना!

लाइफलाइन एक्सप्रेस ट्रेन आता आपल्या पुढच्या प्रकल्पासाठी तुर्कीच्या दिशेने शुक्रवारी ५.१५ वाजता रवाना झाली. रविवार १ ऑक्टोबर रोजी २ वाजता दीनदयाल उपाध्याय नगर, उत्तर प्रदेश जवळील तुर्की स्टेशन (भुसावळ, जबलपूर मार्गे) येथे पोहोचेल.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन