Bhayandar: उत्तनमध्ये जुन्या काळातील जिवंत तोफगोळा आढळला 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Bhayandar: उत्तनमध्ये जुन्या काळातील जिवंत तोफगोळा आढळला

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरात मंगळवारी जुन्या काळातील एक जिवंत तोफगोळा आढळून आला. मीरा-भाईंदर पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल म्हणजेच एनएसजी यांच्या संयुक्त पथकाने तातडीने कारवाई करत हा तोफगोळा सुरक्षितपणे निकामी केला.

Swapnil S

भाईंंदर : भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरात मंगळवारी जुन्या काळातील एक जिवंत तोफगोळा आढळून आला. मीरा-भाईंदर पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल म्हणजेच एनएसजी यांच्या संयुक्त पथकाने तातडीने कारवाई करत हा तोफगोळा सुरक्षितपणे निकामी केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिरा भाईंदर शहरातील एक मोठी दुर्घटना टळली असून संपूर्ण कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

उत्तन परिसरातील जमिनीत गाडलेला एक संशयास्पद धातूचा गोळा स्थानिक नागरिकांना आढळून आला होता. नागरिकांनी याबाबात तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता, ती साधी वस्तू नसून अविस्फोटित स्फोटक सामग्री असण्याची शक्यता समोर आली. मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विशेष तांत्रिक प्रक्रियेद्वारे हा तोफगोळा निकामी करण्यात आला. तपासादरम्यान ही सामग्री अविस्फोटित स्फोटक असल्याचे स्पष्ट झाले.

सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून ही मोहीम फत्ते करण्यात आली. क्षमता विकास उपक्रमांतर्गत नुकतेच मीरा-भाईंदर पोलिसांना आयईडी आणि विविध प्रकारच्या स्फोटकांची ओळख पटवण्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते, अशी माहिती एनएसजी अधिकाऱ्यांनी दिली.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये