'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

गॅस टंचाईमुळे लग्न सोहळे अडचणीत; हॉल व्यावसायिकांवर कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळ

इस्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

Swapnil S

मुंबई : इस्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे उपाहारगृह, खानावळ या व्यवसायांसह आता लग्न समारंभ, हॉल, सभागृह यांनादेखील युद्धाचा फटका बसू लागला आहे. एप्रिल आणि मे हे लग्नसमारंभासाठी महत्त्वाचे महिने असून लग्न समारंभाची दोन महिने आधीच आगाऊ नोंदणी झालेली आहे. परंतु, गॅस टंचाईमुळे मुंबई, ठाणे तसेच उपनगरातील अनेक हॉल व्यावसायिकांवर मोठ-मोठे लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ ओढवली आहे.

लग्न सोहळ्यांसाठी एप्रिल आणि मे महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दोन महिन्यात लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त असतात. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२६च्या एप्रिलमध्ये लग्नासाठी पाच शुभ मुहूर्त आहेत. तर, मे महिन्यात नऊ शुभ मुहूर्त आहेत. यासह काही काढीव मुहूर्त देखील असतात. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक लग्न सोहळे पार पडत असतात. या लग्न समारंभांसाठी वर आणि वधू यांच्या कुटुंबियांकडून दोन ते तीन महिने आधीच हॉलची नोंदणी केली जाते. त्यानुसार, ठाणे शहरासह आसपासच्या शहरातील १००-२०० लोकांच्या क्षमता असलेल्या हॉलपासून ते अगदी ५०० ते १००० लोकांच्या हॉलमध्ये या मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यातील लग्न सोहळ्याची नोंदणी झाली आहे. कुठे २०० माणसांसाठी तर, कुठे ५०० हून अधिक माणसांसाठी ही नोंदणी झाली आहे.

स्वयंपाकासाठी अन्य पर्यायांचा शोध

ठाण्यातील एका लग्न समारंभ हॉलच्या व्यावसायिकाने सांगितले की. ‘आमच्याकडे २०० पर्यंत माणसांसाठी लग्न सोहळ्याची नोंदणी आली आहे. सध्या तीन ते चार दिवस पुरेल इतका गॅस पुरवठा आहे. परंतु, नंतरच्या लग्न समारंभासाठी आमच्यापुढे ईलेक्ट्रिक शेगडी किंवा चुलीवर जेवण बनवण्याचा पर्याय आहे.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल