प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

माघी गणेशोत्सवात रखडलेले विसर्जन २ ऑगस्टला; न्यायालयाच्या परवानगीनंतर गणेश मंडळांचा निर्णय

काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने जलस्त्रोतात पीओपी मूर्तींच्या विसर्जनाला बंदी घातली होती. दरम्यान माघी गणेशोत्सवातील मूर्तींच्या कृत्रिम तलावातील विसर्जनाला मंडळांनी विरोध करीत काही गणेश मंडळांनी गणेशमूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला.

Swapnil S

मुंबई : काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने जलस्त्रोतात पीओपी मूर्तींच्या विसर्जनाला बंदी घातली होती. दरम्यान माघी गणेशोत्सवातील मूर्तींच्या कृत्रिम तलावातील विसर्जनाला मंडळांनी विरोध करीत काही गणेश मंडळांनी गणेशमूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला. आता जवळपास साडेपाच महिन्यांनी उच्च न्यायालयाने पीओपीच्या उंच मूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास परवानगी दिल्याने या मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर आता माघी गणेशोत्सवात विसर्जित न झालेल्या गणेशमूर्तींचे येत्या २ ऑगस्ट रोजी विसर्जन करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. पश्चिम उपनगरातील चारकोपचा राजा तसेच कांदिवलीच्या श्री या मंडळांचा त्यात समावेश आहे.

पर्यावरणापूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पीओपी मूर्तीवर बंदी आणण्याचा प्रयत्न सुरू होता. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, असे आवाहन पालिकेकडून सातत्याने केले जात आहे. यंदाच्या माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेशमूर्तीची कुठेही विक्री होऊ देऊ नका, झालीच तर त्या गणेशमूर्तीचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. या पार्श्वभूमीवर माघी गणेशोत्सवात मात्र महापालिकेने पीओपी मूर्तीच्या विसर्जनास बंदी घातली. १२ किंवा १३ फुटांपर्यंतच्या उंच मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी खास कृत्रिम तलावही तयार केले.

तोपर्यंत विसर्जन न करण्याची भूमिका न्यायालय दिलासा देत

नाही तोपर्यंत विसर्जन न करण्याची भूमिका या मंडळांनी घेतली. अखेर नुकताच न्यायालयाकडून नैसर्गिक जल स्रोतात विसर्जनाला परवानगी देण्यात आल्याने या मंडळांनी येत्या २ ऑगस्टला गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती चारकोपचा राजा मंडळाने दिली आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था