शिरसाट यांना ‘अजिंक्यतारा’ बंगला; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुदत संपली  
मुंबई

शिरसाट यांना ‘अजिंक्यतारा’ बंगला; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुदत संपली

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांची मुदत २९ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला अजिंक्यतारा शासकीय बंगला आता मंत्री संजय शिरसाट यांना देण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांची मुदत २९ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला अजिंक्यतारा शासकीय बंगला आता मंत्री संजय शिरसाट यांना देण्यात आला आहे.

दानवे यांनी मागील अडीच वर्षे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून कामकाज केले. परंतु २९ ऑगस्टला त्यांची मुदत संपली. मुदत संपल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने हा बंगला रिकामा करण्यास सांगितले होते. त्यानंतर दानवे यांनी ‘अजिंक्यतारा’ बंगला रिकामा करून दिला. गेल्या काही दिवसांपासून रिकामा असलेला बंगला आपल्याला मिळावा, अशी विनंती संजय शिरसाट यांनी केली होती. त्यानुसार शासनाने मंत्रालयाशेजारील अजिंक्यतारा बंगला शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिरसाट यांना यापूर्वी अंबर हे निवासस्थान देण्यात आले होते. मात्र, ते निवासस्थान रिकामी करण्याचे निर्देश अवर सचिव संगीता शिंदे यांनी दिले आहेत. या संदर्भातील आदेशाची प्रत राज्यपाल सचिवालय, मुख्यमंत्री कार्यालय व विधान परिषद सचिवालय यांना देण्यात आली आहे.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

BMC Election : मुंबईच्या चाव्या महायुतीकडे; महापालिका निसटली, उद्धव ठाकरेंनी दिली कडवी झुंज

Maharashtra Local Body Election Results : राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ; २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा

BMC Election : मुंबईचे महापौरपद भाजपकडे तर शिंदेंचा उपमहापौर? २८ जानेवारीला महापौरपदाची निवडणूक

Thane : स्वबळाचा नारा काँग्रेसच्या अंगलट; ६० उमेदवारांना ‘भोपळा’ही फोडता आला नाही