देवेंद्र फडणवीस यांचे संग्रहित छायाचित्र FPJ
मुंबई

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही; फडणवीस यांचे वक्तव्य

Maharashtra assembly elections 2024 : २०१९ च्या निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’ची घोषणा देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही’, असे जाहीर केले आहे. फडणवीस यांच्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.

Swapnil S

मुंबई : २०१९ च्या निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’ची घोषणा देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही’, असे जाहीर केले आहे. फडणवीस यांच्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री होणे हा माझ्यासाठी गौण विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची कोणतीही शर्यत नाही. त्या शर्यतीत मी सहभागी नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर पक्षाने माझ्यावर विधानसभेची जबाबदारी दिली. पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांची भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असते. त्यात काहीही वावगे नाही. आता महायुतीचे सरकार असल्याने तेथे भावनांना महत्त्व नाही. घटक पक्षांना सोबत घेऊन जाताना आमच्या इच्छा पूर्ण होतीलच असे नाही, असे फडणवीस म्हणाले.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला १०५ पेक्षा जास्त जागा मिळतील. असे सांगून फडणवीस म्हणाले की, मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात नाही. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहीन, असे ते म्हणाले.

यंदा शिंदे गटाला अजित पवार यांच्यापेक्षा अधिक जागा मिळाल्याबाबत ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी स्वत:ची ताकद निर्माण केली. अजित पवार एक वर्ष उशिराने सरकारमध्ये आले. त्यांना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्यासोबत लढा द्यायचा असल्याने त्यांची सर्व ताकद एकवटायची होती. शिंदे यांच्याकडे पुरेसा वेळ होता. त्यांनी त्यांची ताकद एकवटत विस्ताराकडेही लक्ष दिले. शिवाय त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचाही फायदा मिळाला. त्यामुळेच त्यांना लढविण्यासाठी जास्त जागा मिळाल्या, असे फडणवीस यांनी सांगितले. महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी जास्त जागा, स्ट्राइक रेट असे निकष ठरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

परतीचे दोर कापलेत; भाजपशी संधान बांधणाऱ्यांना शरद पवार यांचा सूचक इशारा

दोन वर्षांत पदवीधर शक्य; विद्यापीठ अनुदान आयोगाचे धोरण तयार

अल्पवयीन पत्नीशी सहमतीचे शरीरसंबंध हाही बलात्कारच;नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

आता विवाहासाठीही मिळणार कर्ज; मॅट्रीमोनी डॉटकॉमची ऑफर

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल; मध्य रेल्वेचा मतदार, निवडणूक कर्मचाऱ्यांना दिलासा