संग्रहित छायाचित्र 
मुंबई

आता निवडणुकीतून माघार नाही; सदा सरवणकर यांचा निर्धार

भाजपचा मुख्यमंत्री मनसेच्या मदतीने होईल, असे राज ठाकरे नुकतेच म्हणाले. त्यावर तिखट प्रतिक्रिया देताना सरवणकर म्हणाले की, 'हे त्यांचे व्यक्तिगत मत असेल. ज्यांचा एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोणाचा होणार? हे सांगणे हास्यास्पद आहे.

Swapnil S

मुंबई : माहीम मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून माहीम, दादर परिसरात मी काम करत असून या कामामुळेच मला येथील मतदार पसंती देत आले आहेत. त्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी लढणारा शिवसैनिक आहे, मागच्या दाराने विधान परिषदेत जाणारा नाही. त्यामुळे आता उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट करीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी भाजपसह मनसेला सूचक इशारा दिला. दरम्यान, 'वर्षा' बंगल्यावर गुरुवारी रात्री गेलो, पण मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही. तेथे उपस्थितांशी चर्चा केली आणि परतलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंना चिमटा

भाजपचा मुख्यमंत्री मनसेच्या मदतीने होईल, असे राज ठाकरे नुकतेच म्हणाले. त्यावर तिखट प्रतिक्रिया देताना सरवणकर म्हणाले की, 'हे त्यांचे व्यक्तिगत मत असेल. ज्यांचा एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोणाचा होणार? हे सांगणे हास्यास्पद आहे. मी त्यांच्यावर टीका करावी, असे मला वाटत नाही. मी महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघात उभा आहे आणि निवडून येणारच'.

माहीम मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महायुती आणि मविआ यांच्यात जागावाटपाबाबत एकमत झाल्यावर उमेदवार जाहीर करण्यात आले. माहीम मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिले असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, मनसेने अमित ठाकरे यांना याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, महायुती असताना अमित ठाकरे यांना पाठिंबा का, असा सवाल उपस्थित करत सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. उमेदवारी मागे घ्यावी यासाठी अनेक फोन आले, दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. त्यामुळे आता माघार नाही, असे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केल्याने हा मनसे व भाजपला एकप्रकारे इशाराच असल्याचे बोलले जाते. दरम्यान, ४ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेणार की लढणार हे लवकरच स्पष्ट होईल.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले