@ANI
@ANI
मुंबई

तोंडाला काळ्या पट्ट्या, हातात 'लोकशाहीची हत्या'चे फलक; राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याचा मविआच्या आमदारांचा निषेध

प्रतिनिधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मानहानी प्रकरणात २ वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याचे आता देशभरात पडसाद उमटत असून विधानभवनातदेखील आज महाविकास आघाडीच्या खासदारांनी निषेध केला. मविआच्या आमदारांनी आज तोंडाला काळी पट्टी बांधून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून निषेध व्यक्त केला.

"राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे" अशी टीका महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. यावेळी त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून निषेध व्यक्त करताना हातामध्ये लोकशाहीची हत्या असे फलकही धरले होते. तसेच, काल विधिमंडळामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी राहुल गांधींच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केले होते. याचाही निषेध आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला. तसेच, अध्यक्षांच्या भूमिकेवर टीका करत आज सभागृहातून वॉकआउट केला.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण