मुंबई

भटक्या कुत्र्यांवरून विधानसभेत चर्चा; बच्चू कडूंनी दिला सल्ला, नेमकं काय घडलं?

आज विधानसभेत भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर आमदार बच्चू कडूंनी अजब सल्ला दिला

प्रतिनिधी

विधानसभेमध्ये आज भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी अनेक आमदारांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, यावर आमदार बच्चू कडू यांनी एक अजब सल्ला दिला. ते म्हणाले की, "भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवण्यात यावे," त्यांच्या या सल्ल्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

विधानसभेत आज आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातळखर, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. यावर बच्चू कडू म्हणाले की, "रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये सोडा. तिकडे कुत्र्यांना किंमत असून ८ ते ९ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर आम्हाला कळले की, आपल्याकडे जसे बोकडाचे मास खाल्ले जाते, तिकडे कुत्र्यांचे मांस खाल्ले जाते. तेथील व्यापाऱ्यांना बोलवून यावर उपाययोजना करा, सध्या या गोष्टीची गरज आहे. एका दिवसांमध्ये यावर तोडगा निघेल. याचा उद्योग होण्यासाठी तेथील सरकारशी बोलण्याची गरज आहे. एकदाचा विषय संपवून टाका." असा सल्ला त्यांनी दिला.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत