...तर डान्सबार परवाना कायमचा रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

...तर डान्सबार परवाना कायमचा रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

डान्सबारबाबतच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचा परवानाच रद्द केला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिला.

Swapnil S

मुंबई : डान्सबारबाबतच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचा परवानाच रद्द केला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिला.

‘परफॉर्मन्स लायसन्स’च्या नावाखाली अश्लिल नृत्ये केली जातात. त्याऐवजी परफॉर्मन्सची (नृत्य सादरीकरण) परवानगी ही डान्सबार कायद्यांतर्गतच घ्यावी लागेल यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यात उशिरापर्यंत ऑर्केस्ट्रा बार सुरू असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याबाबत काँग्रेसच्या नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, “डान्सबार चालक हे परफॉर्मन्स परवान्याच्या नावाखाली नृत्य सादरीकरणाची परवानगी घेतात आणि त्यात अश्लिलता आणली जाते. हे रोखण्यासाठी परफॉर्मन्सची (नृत्य सादरीकरण) परवानगीही डान्सबारविरोधी कायद्यातच घ्यावी लागेल. अशी सुधारणा कायद्यामध्ये चालू अधिवेशनातच केली जाईल.”

तरतुदी आणखी कठोर करणार

परफॉर्मन्स परवाना घेऊन अश्लिलतेचे प्रदर्शन केले जाते, हा प्रकार सर्रास सुरू आहे. याबाबत अनेक तक्रारीदेखील आलेल्या आहेत. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदी कोणत्या करता येतील, यावर शासन पातळीवर विचार सुरू आहे. कायद्याच्या चौकटीतच हे प्रकार निश्चितपणे रोखले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Navi Mumbai : उरणला साथीच्या आजारांचा विळखा; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

ST सहकारी बँकेत ३४ कोटींचा गैरव्यवहार? खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी