Mumbai : महाराष्ट्र दिनानिमित्त दादरमध्ये वाहतूक निर्बंध; कोणते रस्ते बंद? कुठे नो-पार्किंग? वाचा सविस्तर  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : महाराष्ट्र दिनानिमित्त दादरमध्ये वाहतूक निर्बंध; कोणते रस्ते बंद? कुठे नो-पार्किंग? वाचा सविस्तर

महाराष्ट्र दिन संचलनाच्या पार्श्वभूमीवर १ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी दादरमधील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शासकीय संचलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मध्य मुंबईसाठी विशेष वाहतूक सल्ला जारी केला आहे. सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दादर, प्रभादेवी आणि शिवाजी पार्क परिसरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक निर्बंध आणि पार्किंगवरील नियम लागू असणार आहेत. त्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणते रस्ते बंद?

वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, केळुस्कर रोड उत्तर आणि केळुस्कर रोड दक्षिण हे दोन्ही मार्ग अधिकृत वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील.

तसेच, एस. के. बोले रोडवर सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्च जंक्शनदरम्यान एकेरी वाहतूक लागू करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शनदरम्यानही सर्वसामान्य वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध असतील.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी काही पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. सिद्धिविनायक जंक्शनवरून पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांना एस. के. बोले रोड, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड, गडकरी चौक, एल. जे. रोड आणि राजा बढे चौकमार्गे पुढे जावे लागेल. येस बँक जंक्शनवरून सिद्धिविनायककडे थेट जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहनांना पांडुरंग नाईक रोड, राजा बढे चौक, एल. जे. रोड आणि गोखले रोडमार्गे दक्षिण मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.

कुठे असेल नो-पार्किंग?

वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाच्या मार्गांवर नो-पार्किंग झोन जाहीर केला आहे.

या ठिकाणी वाहन पार्किंगला बंदी असेल:

  • केळुस्कर रोड उत्तर

  • केळुस्कर रोड दक्षिण

  • पांडुरंग नाईक रोड

  • एन. सी. केळकर रोड (गडकरी चौक ते कोतवाल गार्डन)

या भागात उभी असलेली वाहने टोईंगद्वारे हटवली जाऊ शकतात, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

अधिकृत वाहनांसाठी खास पार्किंग

पोलीस, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकृत वाहनांसाठी विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

ही पार्किंग स्थळे पुढीलप्रमाणे:

  • वीर सावरकर स्मारक हॉल

  • वनिता समाज हॉल

  • महात्मा गांधी स्विमिंग पूल

  • कोहिनूर PPL पार्किंग, दादर

संचलनाचा मार्ग कसा असेल?

महाराष्ट्र दिन संचलनाची सुरुवात शिवाजी पार्क मैदानातील गेट क्रमांक ५ येथून होणार आहे.

संचलनाचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल:

  • केळुस्कर रोड उत्तर

  • सी. रामचंद्र चौक

  • वीर सावरकर मार्ग

  • केळुस्कर रोड दक्षिण

  • नारळी बाग (समारोप)

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत दादर-शिवाजी पार्क परिसर टाळण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक काम असल्यास या मार्गांचा वापर करावा आणि घटनास्थळी तैनात पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.

अधिकृत वाहन पास नसलेल्या नागरिकांनी दादरमधील महापालिकेच्या कोहिनूर पार्किंगचा वापर करावा, असेही वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वडिलोपार्जित जमिनीचे वाटप सुकर; शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क माफ, राज्य सरकारकडून परिपत्रक जारी

घरातील सोने बँकांमध्ये? उत्पन्नासाठी जेम अँड ज्वेलरी कौन्सिलचा नवा आराखडा, सुवर्ण संघटनेची रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयासोबत चर्चा

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

वाढत्या उष्णतेचा जनावरांनाही फटका; फॉगर बसवून तापमान नियंत्रणाचा प्रयोग