(Photo-X)
मुंबई

Mumbai : शाहरूख, अजय देवगण, टायगर श्रॉफला FDA ची नोटीस

‘विमल इलायची’ची जाहिरात केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) अभिनेता शाहरूख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Swapnil S

मुंबई : ‘विमल इलायची’ची जाहिरात केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) अभिनेता शाहरूख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ११ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटिशीत संबंधित जाहिरात ही ‘विमल’ पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात ठरते का, याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

राज्यात पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ‘विमल’ हा ब्रँड पान मसाल्याशी मोठ्या प्रमाणात जोडला गेला असून ‘विमल इलायची’च्या जाहिरातीमधून प्रतिबंधित उत्पादनाच्या ब्रँडची ओळख आणि ग्राहकांमधील आकर्षण कायम ठेवण्याचा प्रयत्न होतो का, अशी शंका एफडीएने व्यक्त केली आहे.

एफडीएने खाद्य सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ मधील कलम २४, ५३ तसेच जाहिरात आणि ग्राहक संरक्षणासंबंधी विविध नियमांचा दाखला दिला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी कलम ५३ अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे नोटिशीत नमूद आहे.

तिघांना जाहिरात थांबवून ती समाजमाध्यमे आणि अन्य डिजिटल माध्यमांवरून हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जाहिरात करार, उत्पादनाची माहिती, जाहिरात एजन्सी, मोबदला, प्रसाराची माध्यमे आणि जाहिरातीत सहभागी होण्यापूर्वी केलेल्या कराराची कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश