मुंबई

राज्य सरकारची दरेकरांवर कृपादृष्टी; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची खाती आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना खाते उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना खाते उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मंजुरी देण्यात आली. प्रवीण दरेकर यांना सायन येथील कोट्यवधी रुपयांची जमीन नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती, तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात दरेकर यांच्या बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांना खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्यावर राज्य सरकारची कृपादृष्टी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन २०२४-२०२५ या वर्षासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच निवृत्ती वेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यासाठी तसेच शासनाच्या सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी बँकेस प्राधिकृत करण्यासदेखील बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे