मुंबई

मुंबई फेस्टिवलद्वारे महाराष्ट्राचा सांस्कृतिक दृष्टिकोन उलगडणार; २० ते २८ जानेवारीदरम्यान रंगणार महोत्सव

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये २० ते २८ जानेवारी दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. याबाबतची घोषणा बुधवारी ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, राज्याच्या पर्यटन सचिव जयश्री भोज यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. यावेळी पर्यटनमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “मुंबई फेस्टिवल हा महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आहे. हा उत्सव मुंबईच्या सांस्कृतिक भव्यतेची झलक देतो आणि आम्ही सर्वांना या प्रवासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. भावनांना मूर्त रूप देणारी, नवीन संबंध जागृत करणारी आणि महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाला सलाम करणारी ही अभूतपूर्व कलाकृती तयार करण्यात आली आहे. हा कार्यक्रम पर्यटकांचा मुंबईकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.”

पर्यटन सचिव श्रीमती जयश्री भोज म्हणाल्या, “मुंबई फेस्टिवल समाजाच्या सर्जनशील आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला कसे प्रोत्साहन देते, हे पाहून मला आनंद होतो. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे वैशिष्ट्य असलेल्या या सामूहिक प्रयत्नात सहकार्य आणि विविधतेची भावना दिसून येते.” मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, “मुंबई फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राच्या अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक समृद्धीचे चित्रण करण्यात आले आहे. प्रत्येक लहानातील लहान गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले गेले आहे. महाराष्ट्राची अतुलनीय समृद्धता सादर करण्यासाठी होणाऱ्या सर्व सादरीकणापासून ते भव्य प्रदर्शनांपर्यंत तुम्ही पाहत असलेला प्रत्येक पैलू, असंख्य तासांची मेहनत, उत्कटता आणि वचनबद्धता प्रतिबिंबित करते.”

असा असेल कार्यक्रम

उदघाटन समारंभ : २० जानेवारी (काळाघोडा आर्ट फेस्टिव्हल), क्रॉस मैदान गार्डन

पर्यटन परिषद : २४ जानेवारी (ग्रँड हयात, कलिना)

टर्बो स्टार्ट - फॉरएव्हर प्लॅनेट स्टार्टअप चॅलेंज : २५ जानेवारी (बीएसई, फोर्ट)

मुंबई वॉक्स : २५ जानेवारी (गेटवे ऑफ इंडिया)

क्रिकेट क्लिनिक : २०-२१ जानेवारी (ठाकूर क्रिकेट स्टेडियम, कांदिवली-पूर्व)

पॅरामोटर शो : २७ जानेवारी (गिरगाव चौपाटी बीच)

चित्रपट महोत्सव : २०-२४ जानेवारी (मुंबईतील सर्व पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर्स)

संगीत महोत्सव : १९-२८ जानेवारी (मुंबईमध्ये विविध ठिकाणी)

महामुंबई एक्स्पो : २०-२८ जानेवारी (एमएमआरडीए मैदान, बीकेसी)

बीच फेस्ट : २०-२८ जानेवारी (जुहू बीच)

अर्थ मुव्ही काँटेस्ट : २८ जानेवारी (एमएमआरडीए मैदान, बीकेसी)

ग्रँड फिनाले : कॉन्सर्ट फॉर चेंज (समारोप समारंभ) : २८ जानेवारी (एमएमआरडीए मैदान, बीकेसी)

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त