मुंबई

महायुतीचा महाशपथविधी सोहळा; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बडे नेते, दिग्गजांची उपस्थिती

आझाद मैदानात गुरुवारी होणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांसह बडे नेते, कलाकर, साधूसंत, लाडक्या बहिणी, कार्यकर्ते अशा सुमारे ४० हजार जणांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : आझाद मैदानात गुरुवारी होणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांसह बडे नेते, कलाकर, साधूसंत, लाडक्या बहिणी, तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते अशा सुमारे ४० हजार जणांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ६० हून अधिक व्हीव्हीआयपींसाठी भव्य तीन स्टेज उभारण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा अतिशय भव्यदिव्य असा करण्याची तयारी भाजपने केली आहे. गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानात नव्या सरकारचा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे.

दोन हजार व्हीव्हीआयपी पास

महायुतीच्या महाशपथविधी सोहळ्याला ४० हजारांची आसनक्षमता आहे. यात लाडक्या बहिणींसाठी राखीव आसनव्यवस्था असणार आहे. तर दोन हजार व्हीव्हीआयपी पासचे वाटप करण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक