माहिमची कंदील गल्ली ग्राहकांच्या गर्दीने फुलली 
मुंबई

माहिमची कंदील गल्ली ग्राहकांच्या गर्दीने फुलली; आकर्षक डिझाईन, पर्यावरणपूरक कंदील आकर्षणाचे केंद्रबिंदू

माहीम येथील कंदील गल्ली ही विविध आकर्षक रंगीबेरंगी आकाश कंदीलसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी कंदील खरेदीसाठी येथे लोकांची गर्दी होत असते. यंदाही आकर्षक डिझाईन, पर्यावरणपूरक कंदील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.

गिरीश चित्रे

मुंबई : माहीम येथील कंदील गल्ली ही विविध आकर्षक रंगीबेरंगी आकाश कंदीलसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी कंदील खरेदीसाठी येथे लोकांची गर्दी होत असते. यंदाही आकर्षक डिझाईन, पर्यावरणपूरक कंदील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. मुंबई व परिसरातील लोक दिवाळीच्या १० ते १५ दिवस आधीच येथे कंदील खरेदीसाठी येत असतात, असे कंदील विक्रेते विजय पाटील यांनी 'दैनिक नवशक्ति'शी बोलताना सांगितले.

आकर्षक डिझाईन, पर्यावरणपूरक कंदील

माहीम येथील कंदील गल्लीत मुंबईतीलच नव्हे तर मुंबईबाहेरील लोकही कंदील खरेदीसाठी येत असतात. बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण, पनवेल, खारघर या ठिकाणचे लोक दिवाळीपूर्वी खास कंदील खरेदीसाठी कंदील गल्लीत येतात. रस्त्यावर दुकान थाटत असलो तरी रात्री २ वाजेपर्यंत कंदील खरेदीसाठी लोकांची गर्दी असते.

माहिमची कंदील गल्ली ग्राहकांच्या गर्दीने फुलली

या कालावधीत दोन मिनिटे बोलायला वेळ नसतो एवढी गर्दी होते. माहीम, दादर, माटुंगा परिसरात काम करणारे लोक कामावरून सुटले की, जाता जाता कंदील खरेदीसाठी येतात. मुंबईतील बहुतांश कार्यालयात सजावटीसाठी लागणारे लहान, मोठे कंदील खरेदीसाठी कर्मचारी कंदील गल्लीत येतात.

आकर्षक डिझाईन, पर्यावरणपूरक कंदील

आकाश कंदीलाची किंमत प्रति नग ५५० ते ७५० रुपये आहे. लहान कंदील १५० रुपये डझन विक्री केले जात आहेत. १५० रुपये ते ९०० रुपयांपर्यंत साईजनुसार कंदीलांची वेगवेगळी किंमत आहे.

माहिमची कंदील गल्ली ग्राहकांच्या गर्दीने फुलली
कंदील गल्लीत वेगवेगळ्या डिझाईनचे कंदील उपलब्ध होत असल्याने मुंबईबाहेरील लोक कंदील खरेदीसाठी येतात. १५० रुपये ते ८५० रुपयांपर्यंत चांगले कंदील मिळत असल्याने लोक कंदील गल्लीत दिवाळीच्या आठ दिवस आधीच धाव घेतात.
बाजीराव सर्वोदे, कंदील विक्रेते

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग