Mumbai : मालाडला २० व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : मालाडला २० व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

मालाड (प.) येथील बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एव्हरशाईन नगरमध्ये, एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला.

Swapnil S

मुंबई : मालाड (प.) येथील बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एव्हरशाईन नगरमध्ये, एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला.

बांगूर नगर पोलिसांनी संबंधित ‘साइट सुपरवायझर’, ‘सेफ्टी सुपरवायझर’ आणि ‘कंत्राटदार’ यांच्याविरुद्ध कथित निष्काळजीपणा आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यात आलेल्या अपयशामुळे, विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मालाडमध्ये बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे, बांधकाम स्थळांवरील सुरक्षा आणि संरक्षणाबाबत तसेच कंत्राटदारांच्या निष्काळजीपणाबाबतच्या चिंता पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एव्हरशाईन नगरमधील ही घटना २२ एप्रिल रोजी रात्री १०:१० च्या सुमारास ‘वेदांग विवारे’ या बांधकाम स्थळावर घडली. मृत कामगाराची ओळख मनोज गुप्ता अशी पटली आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता यांनी आपले काम पूर्ण केले होते आणि ते खाली येण्यासाठी लिफ्टचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्याचा तोल गेला. तो लिफ्टची ‘शाफ्ट’ (कूपिका) व भिंत यांच्यामधील जागेतून खाली पडला. त्यांना मृत म्हणून घोषित केले.

तक्रारदाराने आरोप केला की, बांधकाम स्थळावर सुरक्षेच्या योग्य उपाययोजना उपलब्ध नव्हत्या आणि घटनेच्या वेळी संपूर्ण मजल्यावर अंधार होता; याच कारणामुळे गुप्ता यांचा तोल जाऊन हा जीवघेणा अपघात घडला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

बदलीच्या तक्रारीसाठी पोलिसांना कार्यालयात आणणे गैरवर्तन; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार