मुंबई

कृषीमंत्री १८ मिनिटे पत्ते खेळत असल्याचे अहवालातून उघड; रोहित पवार यांची एक्सवर पोस्ट

वादग्रस्त विधानामुळे महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे ४२ सेकंद नव्हे, तर १८ ते २२ मिनिटे सभागृहात पत्ते खेळत असल्याचा अहवाल विधी मंडळाचा असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर करण्यात आला आहे, अशी माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.

Swapnil S

मुंबई : वादग्रस्त विधानामुळे महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे ४२ सेकंद नव्हे, तर १८ ते २२ मिनिटे सभागृहात पत्ते खेळत असल्याचा अहवाल विधी मंडळाचा असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर करण्यात आला आहे, अशी माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात पत्ते खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट केला होता.‌ त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला आणि कोकाटे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

हा आठवडा निर्णायक! शेअर बाजाराची नेमकी दिशा ठरणार; सोने-चांदी दराची कसोटी लागणार

मुंबईत तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस

Mumbai : आनंदोत्सवाला लोटला तरुणाईचा जनसागर! 'रंग दे बसंती', 'वंदे मातरम' या गाण्यांवर थिरकले झेन-झी

महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार; पुलाचे काम ९० टक्के पूर्ण

मीराबाईची सोनेरी हॅटट्रिक! राष्ट्रकुलमध्ये सलग तिसरे सुवर्ण जिंकणारी भारताची पहिली वेटलिफ्टर