मनोज सौनिक यांना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शपथ दिली.  
मुंबई

मनोज सौनिक यांनी स्वीकारला महारेराच्या अध्यक्षपदाचा पदभार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख सल्लागार आणि राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी शुक्रवारी महारेराचे तिसरे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख सल्लागार आणि राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी शुक्रवारी महारेराचे तिसरे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

मावळते अध्यक्ष अजोय मेहता यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर त्यांनी महारेराच्या मुख्यालयात पदभार स्वीकारला.

याप्रसंगी महारेराचे सदस्य महेश पाठक, रवींद्र देशपांडे, सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी महारेराचे संचालक (अनुपालन) रमेश पवार, संचालक (नोंदणी) विनोद चिठोरे, उपसंचालक (तक्रारी) सुधाकर देशमुख इ. उपस्थित होते.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस