मुंबई

Maratha Reservation : आंदोलनाला ‘खेळकर’ रंग; आंदोलकांचे मुंबईत क्रिकेट, कबड्डी, खो-खो

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर सोमवारी सलग चौथ्या दिवशी सुरू ठेवलेले उपोषण सुरू असताना, त्यांच्या समर्थकांनी शेजारील सीएसएमटी स्थानक परिसराला अक्षरशः क्रीडांगणाचे रूप दिले. येथे आंदोलकांनी कबड्डी, खो-खो, अगदी कुस्तीही खेळली.

Swapnil S

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर सोमवारी सलग चौथ्या दिवशी सुरू ठेवलेले उपोषण सुरू असताना, त्यांच्या समर्थकांनी शेजारील सीएसएमटी स्थानक परिसराला अक्षरशः क्रीडांगणाचे रूप दिले. येथे आंदोलकांनी कबड्डी, खो-खो, अगदी कुस्तीही खेळली.

आझाद मैदानाबाहेरील रस्त्यावर काही आंदोलक क्रिकेट खेळताना दिसले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेले आरक्षण समर्थक वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये रमून आंदोलनाला रंगत आणत होते आणि एकमेकांचा उत्साह वाढवत होते. आरक्षणाच्या मागणीसाठी शेकडो मराठा समाजबांधव सीएसएमटी आणि दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी जमले होते. यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

सीएसएमटी परिसरात आंदोलकांनी मोठ्या संख्येने नृत्य केले आणि घोषणाबाजी केली. हे ठिकाण आझाद मैदानापासून काही मीटर अंतरावर असून तेथेच जरांगे उपोषणाला बसले आहेत. आंदोलनकर्त्यांनी हिंदी गाणी जसे की ‘मैं हूँ डॉन’ आणि मराठी गाण्यांवर ठेका धरला.

दुपारी काही आंदोलक हार्बर लाईनच्या शेवटच्या टोकावर रुळांवर उतरले, मात्र रेल्वे पोलिसांनी त्यांना त्वरीत बाहेर काढले. त्यामुळे रेल्वेसेवांवर परिणाम झाला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

काही आंदोलकांनी मानवी पिरॅमिड रचला, ज्याच्या माथ्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीने आरक्षणाशी संबंधित मागण्या असलेला फलक हातात धरला होता. आणखी एका घटनेत सीएसएमटी स्थानकातील पंख्याचे पाते वाकवण्यात आले.

२४ तासांत आंदोलकांना हटवा! मुंबई उच्च न्यायालयाचा जरांगे यांना अल्टिमेटम; आझाद मैदानात फक्त पाच हजार आंदोलकांना परवानगी

सुहाना खानच्या अडचणी वाढणार? शेतजमीन खरेदीवर वाद; अटींचा भंग केल्याचा आरोप; महसूल विभागाकडून चौकशी सुरू

पुण्याहून आझाद मैदानाकडे निघालेल्या मराठा बांधवांवर पनवेलमध्ये किरकोळ कारणावरून हल्ला; ५ जण जखमी, दोघांना अटक

मत चोरीच्या अणुबॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार; मोदींना चेहरा लपविण्यासाठीही जागा मिळणार नाही; राहुल गांधींचा मोठा इशारा

इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली