छायाचित्र : विजय गोहिल  
मुंबई

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प

दक्षिण मुंबई शुक्रवारी अक्षरशः ठप्प झाली, कारण हजारो मराठा आरक्षण आंदोलनकर्ते आझाद मैदानात जमा झाले. यामुळे संपूर्ण शहरातील वाहनतळ व सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने ऑफिसला जाणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना व रोजच्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

कमल मिश्रा

मुंबई : दक्षिण मुंबई शुक्रवारी अक्षरशः ठप्प झाली, कारण हजारो मराठा आरक्षण आंदोलनकर्ते आझाद मैदानात जमा झाले. यामुळे संपूर्ण शहरातील वाहनतळ व सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने ऑफिसला जाणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना व रोजच्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

सेंट्रल रेल्वेने जाहीर सूचना देत प्रवाशांना शक्यतो सीएसएमटीकडे प्रवास टाळावा, असे आवाहन केले. "सीएसएमटी स्थानक व परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने प्रवाशांनी आवश्यक असल्यासच टर्मिनसला जावे," अशी पोस्ट विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर केली.

सकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट झाली. सीएसएमटीवर उतरलेले हजारो कामगार पायी, बस किंवा टॅक्सीने फोर्ट, नरीमन पॉइंट, कालबादेवी, क्रॉफर्ड मार्केटकडे जात असतात. परंतु सीएसएमटीजवळील कोंडीमुळे अनेक जण अडकले. काही बस सीएसएमटीजवळ दीर्घकाळ अडकल्या होत्या. परिणामी प्रवासी लांब पल्ल्याचा पायी प्रवास करताना दिसले. पूर्वीय महामार्गालाही (ईस्टर्न फ्रीवे) कोंडीचा फटका बसला.

मनोज जरांगे शेकडो वाहनांच्या ताफ्यासह पूर्वीय महामार्गातून आझाद मैदानात पोहोचले. त्यातील अनेक वाहने महामार्गाजवळ पार्क करण्यात आली.

प्रवाशांचा रोष

अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. दररोजच्या प्रवाशांना त्रास देणारे असे आंदोलन परवानगीने का घेऊ देतात, असा प्रश्न एका युजरने मुंबई ट्रॅफिक पोलिसांना टॅग करून केला. कामकाजाच्या दिवशी आंदोलन का? मुंबईत आधीच वाहतूक कोंडी आहे, त्यात हा त्रास का वाढवता, असे दुसरे युजर दर्शिल देसाई यांनी लिहिले. काहींनी स्वच्छतेबाबतही चिंता व्यक्त केली. सीएसएमटी आपला वारसा आहे. स्वच्छता राखली जावी, अशी मागणी एका युजरने केली.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती