मुंबई

महाराष्ट्र डाक सर्कलतर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा

महाराष्ट्र डाक सर्कलतर्फे मुंबई जीपीओ येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिन २०२५ उत्साहात साजरा करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र डाक सर्कलतर्फे मुंबई जीपीओ येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिन २०२५ उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा सन्मान करण्यासाठी समर्पित होता.

महाराष्ट्र डाक सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त विशेष रद्दीकरण व पोस्टकार्डचे अनावरण केले. या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये प्रसिद्ध सुलेखनकार 'पद्मश्री' अच्युत पालव, सुप्रसिद्ध लेखक व नाटककार गणेश मतकरी, महाराष्ट्र डाक सर्कलच्या महाप्रबंधक (वित्त) जयती समद्दर आणि मुंबई डाक क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल सुचेता जोशी यांचा समावेश होता. या सोहळ्यास विभागाचे कर्मचारी तसेच तिकिट संग्राहकही उपस्थित होते.

या प्रसंगी मराठी कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि विजेत्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र डाक सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांच्या भाषणाने झाला.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च