मुंबई

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘मी मराठी’चा जागर

हिंदी सक्तीला वाढता विरोध लक्षात घेता शासन निर्णय रद्द केल्याने हा मराठी माणसाचा विजय आहे, मराठीचा स्वाभिमान असे फलक व टोपी घालत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर केला.

Swapnil S

मुंबई : हिंदी सक्तीला वाढता विरोध लक्षात घेता शासन निर्णय रद्द केल्याने हा मराठी माणसाचा विजय आहे, मराठीचा स्वाभिमान असे फलक व टोपी घालत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर केला.

आमच्या मागण्यांचा काही अंशी स्वीकार झाला आहे याचा आनंद आहे. मात्र सरकारने पुन्हा एक समिती स्थापन केली आहे हे पाहता सरकारवर अजूनही विश्वास ठेवणे कठीण आहे.
अंबादास दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे अजय चौधरी आदी उपस्थित होते. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्कर जाधव आणि इतर विरोधी आमदारांसह आदित्य ठाकरे यांनी “मी मराठी” असे फलक हातात घेऊन प्रतीकात्मक आंदोलन केले. हिंदी सक्ती विरोधात मराठी भाषिकांनी एकत्र येण्याची घोषणा करताच महायुतीने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला, असे यावेळी नमूद करण्यात आले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली