अमराठी रिक्षाचालकांसाठी मीरा-भाईंदरमध्ये मराठी कार्यशाळा सुरू; दहावीत प्रथम आलेली हिंदी भाषिक सपना साह देणार मराठीचे धडे 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

अमराठी रिक्षाचालकांसाठी मीरा-भाईंदरमध्ये मराठी कार्यशाळा सुरू; दहावीत प्रथम आलेली हिंदी भाषिक सपना साह देणार मराठीचे धडे

मीरा-भाईंदर शहरातील अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी अभिनव कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली आहे.

Swapnil S

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी अभिनव कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राहून रोजगार मिळवायचा असेल, तर मराठी भाषा बोलता येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे.

मीरा-भाईंदर शहरातील तब्बल ५६५ अमराठी रिक्षाचालकांना मराठी येत नसल्याचे समोर आल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी बहारी बाघ शिकवणी कार्यशाळा येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्याचे अल्टीमेटम दिले आहे. या मुदतीत मराठी न शिकल्यास १६ ऑगस्टपासून संबंधितांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मीरा-भाईंदर यांच्या संकल्पनेतून अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा शिकवणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी रिक्षाचालकांना प्रवाशांशी संवाद साधणे सुलभव्हावे, यासाठी तयार करण्यात आलेल्या 'व्यावहारिक मराठी पुस्तिके' चे अनावरण प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले आणि उपस्थित चालकांना त्याचे वाटप करण्यात आले. परिवहन मंत्र्यांच्या या भूमिकेला आणि कार्यशाळेला रिक्षाचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील तीन महिन्यांत आम्ही प्रवाशांशी बोलण्यापुरती मराठी नक्कीच शिकू आणि मराठी भाषेचा पूर्ण सन्मान करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सपना कुमारी साहवर जबाबदारी

या कार्यक्रमाला हेमांगिनी पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकवण्याची जबाबदारी सपना कुमारी साह हिच्यावर सोपवण्यात आली आहे. सपना स्वतः हिंदी भाषिक असूनही तिने मराठी माध्यमातून शिक्षण घेत यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, मराठी विषयात ९१ गुण मिळवत तिने मनपा शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सपनाच्या यशाचे कौतुक करत, तिच्या मेहनतीतून आणि मराठीवरील प्रभुत्वातून प्रेरणा घेऊन सर्व अमराठी बांधवांनी मराठी आत्मसात करावी, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले.

Thane : भाजप नगरसेवकांच्या निलंबनाची शिंदे सेनेची मागणी

NEET घोटाळ्याचे नवे महाराष्ट्र कनेक्शन; कुलकर्णीपाठोपाठ पुण्याच्या प्रा. मनीषा मांढरेला अटक

रायगड पोलीस दलात K-९ कमांडो 'बघिरा'ची एण्ट्री; स्फोटक शोधमोहिमांना मिळणार बळ

धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करा - राहुल गांधी

Telangana : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला पोक्सोप्रकरणी अटक