मुंबई : मुंबईकरांसह पर्यटकांच्या पसंतीस उतरनाऱ्या मरीन ड्राईव्ह परिसरात पालिकेच्यावतीने अनेक सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच नरिमन पॉईंटपासून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) पर्यंत आणि त्यापुढील परिसराचे सौंदर्य अधिक खुलविण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.
नरिमन पॉईंट ते स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) पर्यंत संपूर्ण मरीन ड्राइव्ह परिसराची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी पाहणी केली. या पाहणीप्रसंगी त्यांनी महानगरपालिका अधिकारी, पोलीस अधिकारी यांना विविध सूचना करून तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले.
परिसरातील अनावश्यक रस्तारोधक (बॅरिकेड्स) काढणार
अनावश्यक सूचनाफलक काढणार
परिसरात पायी चालण्याची जागा, आसन व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यात
विजेच्या खांबांवर लोंबकळणाऱ्या वाहिन्या काढणार
खांबांची वेळोवेळी रंगरंगोटी करणार
दिव्यांगांच्या व्हिलचेअरसाठी जागा अधिक सुटसुटीत ठेवणार
परवानगीशिवाय फलक, पोस्टर्स लागणार नाही