मुंबई

Video : मरीन ड्राईव्ह ते वरळी फक्त ९ मिनिटांत! मुंबई कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी

Suraj Sakunde

मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरिन ड्राईव्ह ते हाजी अलीदरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतूकीसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बोगद्याची आज पाहणी केली. कोस्टल रोडच्या बोगद्याचं थोड्याच वेळात उद्धाटन होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर हा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळं मरिन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास फक्त ९ मिनिटांत करता येणार आहे. वरळी ते मरिन ड्राईव्ह ही मार्गिका काहीच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र मरिन ड्राईव्ह ते वरळी या टप्प्याचं काम सुरु होतं. आजपासून मरिन ड्राईव्ह ते हाजी अली एवढाच टप्पा सुरु होणार आहे. हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरु होण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोडची एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. या प्रकल्पाचं सुमारे ९० टक्के काम पूर्ण झालं असून, हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पातील जो हिस्सा वाहतुकीसाठी वापरात आणणं शक्य आहे, तो उपलब्ध करून द्यावा व त्यामाध्यमातून मुंबईकरांचा प्रवास जलद व अधिक सुखकर व्हावा, या हेतूनं टप्प्याटप्प्यानं मार्ग खुले करण्यात येत आहेत. यापूर्वी ११ मार्च रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका सुरु करण्यात आली होती.

आता प्रामुख्यानं मरीन ड्राईव्ह ते हाजी अली अशा सुमारे ६.२५ किमी लांबीचा मार्ग खुला होत आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या आंतरमार्गिकेवरून उतरून किंवा प्रवेश करून वेगवेगळ्या भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल. प्रामुख्यान बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेनं तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस