मुंबई

वाडिया हॉस्पिटलला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी

मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून आढावा घेतला. तसेच आग कशामुळे लागली याची चौकशी केली. तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

प्रतिनिधी

मुंबईतील परळ येथील वाडिया हॉस्पिटलला भीषण आग लागली आहे. रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरला आग लागली आहे. महिलांच्या प्रसूतीसाठी हे हॉस्पिटल ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, ही लेव्हल 2 ची आग आहे. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत असून आतापर्यंत कोणीही जखमी किंवा मृत झाल्याची माहिती समोर आली नाही. मात्र आगीच्या घटनेमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे.

वाडिया हॉस्पिटलला आग लागल्याचे वृत्त समजताच मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून आढावा घेतला. तसेच आग कशामुळे लागली याची चौकशी केली. तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यावरून आगीची तीव्रता लक्षात येते. ही आग बंद ऑपरेशन थिएटरमध्ये लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तसेच या आगीत नेमके किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन