मुंबई

Mega block Update : तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी (ता.१९) मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी (ता.१९)  मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वेने दिवसा ब्लॉक घेतल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांवर  थांबतील. या गाड्या आपल्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे येथून सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर या लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांवर थांबून माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे वाशी/नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा ब्लॉक कालावधीत रद्द राहतील.

"२० जुलैपर्यंत जिवंत राहीन, नाहीतर भूत बनून परत येईन"; सोनम वांगचुक उपोषणावर ठाम

कल्याण-सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीहून 'डाउन' प्रवासामुळे राडा; महिलेने थेट पेपर स्प्रे फवारला

Mumbai : प्रस्तावित 'रेल्वे टर्मिनस' लटकले; रेल्वे, संरक्षण मंत्रालयात जमिनीचा वाद

Mumbai : आता कोस्टल रोडमध्ये बहुभाषिक फलक

बोगस पॅथॉलॉजिस्टची चौकशी होणार; NABL चा निर्णय