मुंबई

वाढत्या वायूप्रदूषणाचा फटका 'मेट्रो-३'च्या कामांना; महापालिकेने बजावली तात्काळ काम थांबवण्याची नोटीस

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला बघून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील मुंबईतील 14 प्लांटसला नोटीस पाठवली आहे.

नवशक्ती Web Desk

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. अशातच मुंबईत देखील प्रदूषणाची भीषण परिस्थिती उद्भवली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने मेट्रो-3 च्या कंत्राटदाराला जोरदार दणका दिला आहे. प्रशासनानं काही दिवस काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे .सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी लागू केलेली नियमावली न पाळल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतील वाढतं प्रदूषण बघून प्रशासनाने ते प्रदूषण कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत. मात्र या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन बीकेसी भागात योग्य रीतीने होत नसल्याने मुंबईतील मेट्रो तीनचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला बीएमसीकडून काही दिवस काम बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

राज्यातील वायू प्रदूषणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आढावा बैठक घेणार आहेत. पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेतील काही कर्मचारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वाढत्या प्रदूषणच्या पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व आणि सांताक्रुज पूर्व या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम कामांना देखील मुंबई महापालिकेने नियमांचं उल्लंघन करत असल्याप्रकरणी या साईटवर काम बंद करण्याबाबत नोटीस पाठवली आहे.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला बघून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील मुंबईतील 14 प्लांटसला नोटीस पाठवली आहे. जे मुख्यत्वे करून मुंबईतील कोस्टल रोड, एमटीएचएल, मेट्रो कॉरिडॉर यासारखे विकास प्रकल्पांची काम करत आहेत. मुंबई मेट्रो-३ लाईनच्या कामामध्ये आयटीओ जंक्शन येथे बांधकाम सुरू असताना एक साइट बॅरिकेड केलेली नव्हती किंवा ताडपत्री/हिरव्या कापडाने साईट झाकलेली नव्हती आणि कामगारांना मास्क देखील दिले गेले नव्हते हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आणि त्यानंतर त्यांना काम थांबवण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Metro: सर्व मेट्रो तिकिटासाठी आता एकच ॲप; एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गांसाठी तिकिटे खरेदी करता येणार

रेल्वे ऑनलाइन तिकीट आरक्षणासाठी आधार अधिप्रमाणीकरण अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून नियम लागू होणार

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो अ‍ॅक्वा लाईन ३चे उद्घाटन लांबणीवर

राज्यसभेच्या ५ जागांसाठी २४ ऑक्टोबरला मतदान