मुंबई

मेट्रो, मोनो रेल ठरले पांढरा हत्ती

एमएमआरडीएला ८०० कोटींपर्यंत तोटा

अतिक शेख

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुलभ करण्यासाठी सुरू केलेल्या मेट्रो २ ए व ७ तसेच मोनो रेल प्रकल्प केवळ पांढरा हत्ती ठरले आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे एमएमआरडीएला यंदा ८०० कोटी रुपयांचा तोटा होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मेट्रो २ ए ही दहिसर पूर्व ते अंधेरीदरम्यान, तर मेट्रो ७ ही दहिसर पूर्व ते गुंदवलीदरम्यान चालवली जाते. तर चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान मोनो रेल्वे चालवली जाते. मेट्रो २ ए व ७ ही मेट्रो मार्गिका सुरू होऊन केवळ एकच वर्ष झाले आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत या मार्गिकेवर २८०.७४ कोटी तोटा झाला आहे. ३५.१ किमी अंतराच्या या मार्गावर ४१.२६ कोटी महसूल मिळाला, तर खर्च ३२२ कोटी झाला आहे. या दोन मार्गिकांवर रोज २.१० लाख प्रवासी प्रवास करतात. तरीही हा मार्ग तोट्यात आहे.

मुंबई मोनो रेल हाही पांढरा हत्ती ठरत आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये मोनो रेलच्या व्यावसायिक फेऱ्या सुरू झाल्या. त्यावेळेपासून आतापर्यंत मोनो रेल्वेला कायम तोटा होत आहे. मोनो रेलमधून रोज १० हजार प्रवासी प्रवास करतात. दर २५ मिनिटांनी या गाडीची वारंवारिता आहे. २०२२-२३ मध्ये मोनो रेलमधून ३६.३६ लाख प्रवाशांनी प्रवास केला.

२०२३-२४ मध्ये मोनो रेल १३.६४ कोटी महसूल गोळा करू शकेल, तर खर्च अंदाजे ५४२.६३ कोटी असेल. त्यामुळे मोनो रेल्वेला ५२३ कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. मोनो रेल्वेचा अर्धा खर्च केवळ नवीन डबे आणण्यासाठी केला जाणार आहे. एमएमआरडीएने १० मोनो रेल्वे ट्रेनची ऑर्डर दिली आहे. सध्या मोनो रेल्वेच्या ताफ्यात ११ ट्रेन्स आहेत. त्यातील ८ ते ९ ट्रेन्स कार्यरत आहेत.

एमएमआरडीएसाठी दोन मेट्रो मार्गिकांतून १२.८ टक्के महसूल मिळत आहे, तर मोनो रेल्वेतून ५.४ टक्के महसूल मिळतो.

असा आहे ताळेबंद

मेट्रो २ ए व ७ (३१ मार्च २०२३ पर्यंत)

खर्च - ३२२ कोटी

महसूल - ४१.२६ कोटी

तोटा - २८०.७४ कोटी

मोनो रेल (२०२३-२४)

खर्च - ५४२.६३ कोटी

महसूल - १३.६४ कोटी

तोटा - ५२८.९९ कोटी

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय - उद्धव ठाकरे