मुंबईत सर्वसामान्यांसाठी २ हजार ६४० घरे; आजपासून म्हाडाचा अर्ज भरता येणार  
मुंबई

मुंबईत सर्वसामान्यांसाठी २ हजार ६४० घरे; आजपासून म्हाडाचा अर्ज भरता येणार

MHADA Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे विविध प्रकल्प आणि उत्पन्न गटातील २ हजार ६४० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी आज जाहीर करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे विविध प्रकल्प आणि उत्पन्न गटातील २ हजार ६४० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी आज जाहीर करण्यात आली आहे. लॉटरीची जाहिरात ३० मार्च रोजी विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार इच्छुकांना २९ एप्रिल रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लॉटरीसाठी अर्ज करता येईल, तर प्राप्त अर्जांची लॉटरी १५ मे रोजी सकाळी ११ वाजता काढली जाणार आहे.

या लॉटरीत मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरिवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील २ हजार ६४० घरांचा समावेश करण्यात आला आहे.

लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते सोमवार, ३० मार्च रोजी ‘गो लाइव्ह’ समारंभाद्वारे प्रारंभ केला जाणार आहे. यानंतर लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी ३ वाजल्यापासून उपलब्ध राहील. तसेच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

अशी आहे घरांची संख्या

मुंबई मंडळाच्या सन २०२६ च्या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५ घरे, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८ घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी १४०८ घरे, उच्च उत्पन्न गटासाठी २२९ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या लॉटरीत म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे बांधकाम सुरू असलेली १७६२ घरे, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त ३७१ घरे, विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त १८८ घरे तसेच मुंबई मंडळाच्या मागील सोडतींमधील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त व मंडळाच्या विखुरलेल्या ३१९ घरांचा या लॉटरीत समावेश आहे. विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत विकासकांकडून प्राप्त घरे 'जशा आहे त्या स्थितीमध्ये' विक्रीकरिता उपलब्ध आहेत.

असा करा अर्ज

म्हाडाने https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे.

Mumbai Rain : पुढील ४८ तास मुंबईसह उपनगरांसाठी रेड अलर्ट; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

Thane : पाण्यात उतरलेल्या करंटमुळे १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांकडून निष्काळजीपणाचा आरोप

Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका

कर्ज बाजारपेठ दुप्पट; भारतातील बँकांचे कर्ज वितरण पाच वर्षात पोहोचले २५ अब्ज डॉलरवर

Navi Mumbai : ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; महिलेच्या मृत्यूप्रकरणी आयुक्तांची कारवाई