मुंबई

म्हाडाची घरे अडकली नाशिक महापालिकेच्या लालफितीमध्ये

नाशिक महानगरपालिकेमार्फत सुमारे बारा विकासकांना एफएसआय/ टीडीआर देण्यात येत नसल्याने विकासकांनी म्हाडास राखीव क्षेत्र हस्तांतरीत करण्यास असमर्थता दर्शविली आहे.

Swapnil S

मुंबई : नाशिक महानगरपालिकेमार्फत सुमारे बारा विकासकांना एफएसआय/ टीडीआर देण्यात येत नसल्याने विकासकांनी म्हाडास राखीव क्षेत्र हस्तांतरीत करण्यास असमर्थता दर्शविली आहे. नाशिक महापालिकेच्या लालफितीच्या कारभारामुळे अत्यल्प व अल्प गटासाठी अंदाजे ५ हजार घरांची गृहनिर्माण योजना राबविण्यात अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत नाशिक महानगरपालिकेला सूचना देण्यात यावी, अशी विनंती म्हाडाने राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली आहे.

सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत राखीव क्षेत्र म्हाडाला विनामुल्य हस्तांतरीत करणाऱ्या विकासकास संबंधित महानगरपालिकेने एफएसआय /टीडीआर देणे अभिप्रेत आहे. मात्र नाशिक महानगरपालिकेने विकासकांना म्हाडास सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेकरिता उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या भुखंडाच्या मोबदल्यात एफएसआय/ टीडीआर देण्यात आलेला नाही. म्हाडाने नगरविकास विभागाला पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...