मुंबई

मुंबईत दूध लीटर मागे २ ते ३ रुपयांनी महागणार ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होण्याची शक्यता

शनिवारी दुध विक्रेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

नवशक्ती Web Desk

दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. आधी टोमॅटो, त्यानंतर कांदा आणि आता दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत १ सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार आहे. म्हशीच्या एक लीटर सुट्या दुधामागे २ ते ३ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर होलसेल दरात देखील २ रुपयांनी वाढ होणार आहे. शनिवारी दुध विक्रेत्यांच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

जनावरांच्या चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम दुध उत्पादकांवर झाला आहे. त्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मुंबईत एक लिटर म्हशीच्या सुट्या दुधाचे दर ८५ रुपये असून ते आता ८७ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर रिटेलला हे दुध ८७ ते ८८ रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत ३ हजारहुन अधिक दुध विक्रेते आहेत. जे ब्रँडेड किंवा पँकेटबंद दुध नसतं त्याची विक्री सुट्या पद्धतीने केली जाते, अशा दुधाच्या दरात वाढ होणार होणार आहे.जनावरांच्या चाऱ्याच्या भावात वाढ झाल्याने ही भाववाढ होणार आहे. मुंबईतील सर्व दुध विक्रेत्यांची बैठक पार पडली, त्या बैठकीत दुधच्या दरवाढीसंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले