५०० हून अधिक लाडक्या बहिणींनी घेतली गरुड झेप...; लाडक्या बहिणी झाल्या उद्योजक - आदिती तटकरे X - @iAditiTatkare
मुंबई

५०० हून अधिक लाडक्या बहिणींनी घेतली गरुड झेप...; लाडक्या बहिणी झाल्या उद्योजक - आदिती तटकरे

मुंबई : पुरुषांच्या बरोबरीने महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना व बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्योजक होत आहेत. त्यामुळे लाडकी बहिण लाडक्या उद्योजिका होत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी केले.

Swapnil S

मुंबई : पुरुषांच्या बरोबरीने महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना व बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्योजक होत आहेत. त्यामुळे लाडकी बहिण लाडक्या उद्योजिका होत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी केले.

झेप फाउंडेशनच्या वतीने विकसित भारत महिला उद्योजिका २०२५ च्या संमेलनाचे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी, महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

जागतिक महिला दिननिमित्त झेप फाउंडेशनने ५०० पेक्षा अधिक बचत गटाच्या महिलांना एकत्रित केले आहे. दोन कोटीपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील महिलेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेचा लाभ महत्वपूर्ण ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी महिलांचा आपण आधार होऊ शकतो याचे समाधान लाभले असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.

झेप फाउंडेशनने अशा महिलांना एकत्रित करून त्यांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहन दिले. महिलांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. महिलांचेही कुटुंबातील योगदान वाढावे यासाठी हा प्रयत्न आहे. गरजू महिलांना सहकार्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. ज्या महिला शासनाच्या या प्रयत्नांना साथ देत आहेत, चौकटी आणि रूढी परंपरातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना आणि ज्या भगिनी त्यांना यासाठी सहकार्य करीत आहेत अशा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

महिलांच्या पंखांना बळ देण्याचे शासनाचे कार्य - अश्विनी भिडे

जिद्द आणि महत्वाकांक्षा असेल तर महिलाही आपले ध्येय गाठू शकतात. लघु उद्योगात ७० टक्के महिला कार्यरत आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनाही उद्यमशील बनवू शकतो. महिलांसाठी आकाश मोकळे आहे त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम राज्य शासन करीत असून केवळ महिलांच्या महत्वाकांक्षा आणि जिद्दीने हे साध्य होणार असल्याचे प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी यावेळी सांगत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई