प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mira-Bhayandar : सोसायटीच्या ऑडिटसाठी मागितली लाज; सनदी लेखापाल ACB च्या जाळ्यात

मीरा-भाईंदरमध्ये एका सोसायटीच्या २०२१-२२ वर्षाच्या ऑडिटसाठी लाच मागणी केल्याप्रकरणी सनदी लेखापाल अविनाष मोहिते रंगेहात अटकेत आले आहेत. आरोपी यांनी सुरुवातीला ७ लाख रुपयांची लाच मागितली होती, त्यानंतर ३ लाख ५० हजार रुपयांवर तडजोड झाली आणि शेवटी १ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

Swapnil S

भाईंंदर : मीरा-भाईंदरमध्ये एका सोसायटीच्या २०२१-२२ वर्षाच्या ऑडिटसाठी लाच मागणी केल्याप्रकरणी सनदी लेखापाल अविनाष मोहिते रंगेहात अटकेत आले आहेत. आरोपी यांनी सुरुवातीला ७ लाख रुपयांची लाच मागितली होती, त्यानंतर ३ लाख ५० हजार रुपयांवर तडजोड झाली आणि शेवटी १ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

अटक ही कारवाई २९ जानेवारी २०२६ रोजी मीरारोड पूर्वेच्या रामदेव पार्क परिसरातील चंद्रेश एकार्ड बिल्डिंग, साईबाबा मंदिराजवळ, बिल्डिंग नं. ६, प्लॉट नं.२ येथे पार पडली.

आरोपी अविनाश मोहिते यांनी तक्रारदाराकडून सोसायटीचे पुर्नऑडिट करून अहवाल देण्याच्या नावाखाली लाच घेतली. अटक दरम्यान आरोपीची अंगझडती आणि घरझडती घेतली गेली, तसेच त्यांचा मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेतला गेला. हा प्रकरण लाचलुचपत पडताळणी २८ जानेवारी रोजी करण्यात आलेल्या तपासणीनंतर उघडकीस आला. मीरारोड पोलीस ठाण्यात फिर्यादी विजय कावळे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा कारवाई विजय कावळे (पोलीस निरीक्षक), सुनील कारोटे (पोलीस निरीक्षक) यांच्या पथकाने केली असून, मुख्य आरोपी अविनाश मोहिते यांना अटक करण्यात आली, तर इतर कर्मचारी तपासकामी ताब्यात घेतले गेले आहेत. हा प्रकार सोसायटी ऑडिटमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक उपाययोजनांची गरज अधोरेखित करतो. याप्रकरणी सापळा अधिकारी विजय कावळे, पोलीस निरीक्षक, सुनील कारोटे पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने केली आहे.

मुंबईकरांना मिळणार शुद्ध पाणी; भांडुप संकुलात दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प

Mumbai : ...ती भ्रूणहत्याच ठरेल; न्यायालयाने नाकारली गर्भपाताची परवानगी; खर्च राज्यशासनाने करण्याचे आदेश

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प लांबणीवर पडण्याची चिन्हे; यंदाचा अर्थसंकल्प ८२ हजार कोटींच्या घरात जाणार

शरद पवार पुन्हा सार्वजनिक कार्यात सक्रिय; प्रदूषित नीरा नदीचा आकस्मिक आढावा

राज्यातील ITI चे आधुनिकीकरण; पहिल्या टप्प्यात तीन ITI चा समावेश; विद्यमान अभ्यासक्रमात होणार सुधारणा