मीरा-भाईंदरमध्ये ७१ बेकायदा बोअरवेल्स | प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

मीरा-भाईंदरमध्ये ७१ बेकायदा बोअरवेल्स

भूगर्भजलाचा बेकायदा उपसा करून ते मिनरल वॉटर म्हणून विक्री करणाऱ्या पाणी माफियांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. मीरा-भाईंदर परिसरातील ७१ बेकायदा बोअरवेलधारकांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

Swapnil S

भाईदर : भूगर्भजलाचा बेकायदा उपसा करून ते मिनरल वॉटर म्हणून विक्री करणाऱ्या पाणी माफियांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. मीरा-भाईंदर परिसरातील ७१ बेकायदा बोअरवेलधारकांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्या असून, पाणी माफियांचे प्लांट आणि अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय महापालिकेतील संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.

मीरारोडमधील डाचकुलपाडा येथे रिक्षाचालक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात झालेल्या वादानंतर या भागातील बेकायदा बांधकामे आणि पाणी माफियांचा मुद्दा ऐरणीवर आला.

स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता

दरम्यान, अनेक वर्षे भूगर्भजलाची चोरी करून पाणी माफियांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदा नफा कमावण्यात आला आहे. शासनाच्या मालकीच्या पाण्याची चोरी, त्याची विक्री आणि अनधिकृत बांधकामांसाठी स्वतंत्र गुन्हे दाखल करणे आवश्यक असल्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे. केवळ नोटीस देणे किंवा नाममात्र १० हजारांचा दंड आकारून प्रकरण निकाली काढू नये, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग