मीरा-भाईंदरला ५० ते ६० एमएलडी पाणी मिळणार; सूर्या जलवाहिन्यांचे फ्लशिंग पुढील आठवड्यापासून 
मुंबई

मीरा-भाईंदरला ५० ते ६० एमएलडी पाणी मिळणार; सूर्या जलवाहिन्यांचे फ्लशिंग पुढील आठवड्यापासून

सूर्या धरण प्रकल्पातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेला मंजूर असलेले २१८ दशलक्ष लिटर पाणी टप्प्याटप्प्याने शहरात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुढील आठवड्यापासून शहरांतर्गत जलवाहिन्यांच्या फ्लशिंगचे काम सुरू होणार असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात ५० ते ६० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Swapnil S

भाईंदर : सूर्या धरण प्रकल्पातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेला मंजूर असलेले २१८ दशलक्ष लिटर पाणी टप्प्याटप्प्याने शहरात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुढील आठवड्यापासून शहरांतर्गत जलवाहिन्यांच्या फ्लशिंगचे काम सुरू होणार असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात ५० ते ६० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबईतील एमएमआरडीए मुख्यालयात आढावा बैठक पार पडली.

सूर्या प्रकल्पांतर्गत १३२ केव्ही उपकेंद्राचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शहरात आठ जलकुंभ उभारण्यात आले असून, काही भागांतील अंतर्गत जलवाहिन्यांची कामेही पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सर्व कामे पूर्ण होण्याची वाट न पाहता ज्या भागांत जलवाहिन्यांची जोडणी झाली आहे, तेथे टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जलवाहिन्यांच्या फ्लशिंग

प्रक्रियेस सुमारे एक महिना लागणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणीपुरवठा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या बैठकीला एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा तसेच वन, जलसंधारण, महसूल आणि पर्यावरण विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शहरातील पाणीटंचाई दूर होण्याच्या आशा

सूर्या प्रकल्पातील पाण्यावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरही सरनाईक यांनी भाष्य केले. मीरा-भाईंदरसाठी पूर्ण २१८ एमएलडी पाणी मंजूर असून, त्यासाठी कोणालाही बलिदान देण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचे नाव न घेता लगावला. एमएमआरडीए, महापालिका आणि संबंधित विभागांच्या कामांचा दर १५ दिवसांनी आढावा घेऊन प्रगतीचा अहवाल जनतेसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई दूर होण्याच्या आशा नागरिकांमध्ये निर्माण झाल्या आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : १६ हजार बॅनर्सवर कारवाई; दीड महिन्यांत मात्र केवळ १७ जणांवर गुन्हे दाखल

महाविकास आघाडीत शरद पवार गट लक्ष्य; ठाकरे गट आणि काँग्रेसची जोरदार टीका

Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

पूर्वसूचना न देता सरकारविरुद्ध दावा दाखल करता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

जळगाव जिल्हा बँकेसाठी आज मतदान'; ९ जागांसाठी २९ उमेदवार; सोमवारी मतमोजणी