Mira-Bhayandar : मेट्रो ब्रिजचा ब्लॉक कोसळून तरुण जखमी (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट)
मुंबई

Mira-Bhayandar : मेट्रो ब्रिजचा ब्लॉक कोसळून तरुण जखमी

मिरा-भाईंदरच्या काशिमीरा परिसरात मेट्रो ब्रिजखालील कामादरम्यान सिमेंटचा मोठा ब्लॉक कोसळून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली.

Swapnil S

मिरा रोड : मिरा-भाईंदरच्या काशिमीरा परिसरात मेट्रो ब्रिजखालील कामादरम्यान सिमेंटचा मोठा ब्लॉक कोसळून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. अक्षित बारसमोर ही घटना घडली असून, शादाब या तरुणाच्या डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या मिरा रोड येथील वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शादाब रस्ता ओलांडून जात असताना त्याला फोन आला. फोनवर बोलण्यासाठी तो रस्त्याच्या मध्यभागी थांबला असतानाच मेट्रो ब्रिजच्या कामाच्या ठिकाणाहून सिमेंटचा मोठा ब्लॉक त्याच्या डोक्यावर कोसळला. गंभीर जखमी झाल्यानंतरही तो जवळपास तासभर रस्त्यावर पडून असल्याची माहिती आहे. रस्त्यालगत उभ्या असलेल्या मोठ्या वाहनांमुळे तो वाहनचालकांच्या किंवा नागरिकांच्या सहज लक्षात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर एका व्यक्तीचे लक्ष गेल्यानंतर रिक्षाच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही बांधकाम साहित्य, लोखंडी सळ्या आणि धातूच्या वस्तू खाली कोसळल्याच्या घटना घडल्याचा स्थानिकांचा दावा आहे. महिनाभरापूर्वी स्कूल व्हॅनजवळ लोखंडी वस्तू कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

या कामाचा ठेका जयकुमार नावाच्या ठेकेदाराकडे असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत असून, सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित ठेकेदार किंवा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रविवार ठरला घातवार! विविध अपघातांमध्ये ५ जण ठार, ९ जखमी

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

परतीचा प्रवासही मुंगीच्या गतीने; मुंबई-गोवा मार्गावर वाहतूककोंडी

जरांगे माघारीचे नाट्य, पडद्याआडच्या कुरापती....!