Mira Road : टॉवर क्रेन कोसळून एक ठार, दोघे जखमी  (Photo-X)
मुंबई

Mira Road : टॉवर क्रेन कोसळून एक ठार, दोघे जखमी

मिरारोड पूर्व येथील घोडबंदर परिसरातील जेपी नॉर्थ गृहसंकुलाच्या शेजारी जे.के. आयरिश सोसायटीशेजारी बांधकाम चालू असलेल्या इमारतीचा टॉवर क्रेन कोसळून एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

भाईंदर : मिरारोड पूर्व येथील घोडबंदर परिसरातील जेपी नॉर्थ गृहसंकुलाच्या शेजारी जे.के. आयरिश सोसायटीशेजारी बांधकाम चालू असलेल्या इमारतीचा टॉवर क्रेन कोसळून एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले आहेत.

बांधकाम प्रकल्पावर सुमारे १०० ते १२० फूट उंचीची टॉवर क्रेन गुरुवारी सायंकाळी अचानक कोसळली. या दुर्घटनेत संकुलातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. मृताचे नाव मोहम्मद मुज्जमिल खोकर (२१) आहे.

या इमारतीचे बांधकाम सध्या ११ व्या मजल्यापर्यंत पूर्ण झाले असून त्याच ठिकाणी हा प्रकार घडला.

टॉवर क्रेनचा काही भाग जे.के. आयरिश ह्या गृहसंकुलाच्या परिसरात आणि पार्किंगमध्ये पडल्याने तेथे उभ्या असलेल्या अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली